पुणे

तिळगुळ घ्या... गोड बोला !

CD

पुणे शहरात संक्रांतीनिमित्त शुभेच्छांचे वाण

पुणे, ता. १४ : ‘तिळगुळ घ्या... गोड बोला’ म्हणत आप्तांना दिलेला तिळगुळ... स्रियांनी बोरे, गाजर, भुईमुगाच्या शेंगा, गव्हाच्या ओंब्या यांचे सुगड्यात घालून दिलेले वाण... हळदी-कुंकवाचे छोटेखानी समारंभ आणि जोडीला ‘ढिल दे रे’ म्हणत लहान मुलांनी घेतलेला पतंग उडवण्याचा आनंद... अशा उत्साही वातावरणात शहरात शुक्रवारी मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून शहरात थंडी वाढली होती. या थंडीपासून बचाव करण्यासाठी शरीरात उष्णता निर्माण व्हावी तसेच कोरोनापासून संरक्षण व्हावे, अशा शुभेच्छा संक्रांतीनिमित्त देत नागरिकांनी परस्परांना तिळगुळाचे वाटप करत एकमेकांना शुभेच्छांचे वाण दिले.
शहरातील विविध मंदिरांना संक्रांतीनिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली होती. देवी-देवतांना तिळगुळाचा नैवेद्य दाखवण्यात आला. स्त्रियांनी देवतांचे दर्शन घेऊन त्यांना वाण अर्पण केले. त्यांनंतर परस्परांना हळदी-कुंकू लावून बोरे, गाजर, भुईमुगाच्या शेंगा, गव्हाच्या ओंब्या यांचे सुगड्यात घालून वाण दिले.

हलव्याच्या दागिन्यांनी मुले नटली
कोरोना निर्बंधांमुळे गर्दी करण्यास प्रतिबंध असल्याने हळदी-कुंकू समारंभ छोटेखानी प्रमाणात साजरे झाले. यासह विविध ठिकाणी बिस्किटे, गोळ्या, बोरे, चुरमुरे आदींनी लहान मुलांचे बोरन्हाण केले गेले. मुकूट, हार, कानातले असे आकर्षक पद्धतीने तयार केलेले हलव्याचे दागिने आणि काळ्या रंगाचे परकर-पोलके व कुर्ते घालून लहान मुले नटली होती.
ःः
नव दांपत्यांना काळे कपडे भेट
नवविवाहीत वधू आणि जावयाचेही संक्रांतीला कौतुक केले जाते. त्यामुळे नुकतेच लग्न झालेल्या दांपत्यांना नवीन काळे कपडे भेट देण्यात आले. तसेच स्त्रियांनी मंगळसूत्र, कानातले, बाजूबंद, अंगठी असे हलव्याचे दागिने परिधान केले होते. तर बच्चेकंपनीने दिवसभर पतंग उडवण्याचा आनंद घेतला. रंगीबेरंगी पतंगी आकाशात उंच उडवण्यासाठी आणि एकमेकांचे पतंग कापण्यासाठी चुरस रंगल्याचे पाहायला मिळाले.

35535

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Germany Hanau Ganesh Festival: हानाऊमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह; जर्मनीच्या विविध राज्यांतील भारतीय समुदाय एकत्र

Saudi Arabia: सौदी अरेबियाला मदिनामध्ये सापडला 110 दशलक्ष टन युरेनियमचा प्रचंड साठा, इराणशी तणाव अन् अमेरिकेशी अणुकरार

SCROLL FOR NEXT