पुणे

किशोरवयीन मुलांसाठी १७९ केंद्रावर लस उपलब्ध

CD

पुणे, ता. ७ : शहरातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी आता १७९ केंद्रांवर लस उपलब्ध करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वयोगटातील प्रत्येक मुलांना लवकर लस मिळेल, अशी व्यवस्था उभारली आहे.

शहरात तीन जानेवारीपासून ४० केंद्रांवर किशोरवयीन मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. आतापर्यंत १९ हजार मुलांनी लस घेतली आहे. या लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी लसीकरण केंद्रांची संख्या वाढविली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या सूचनेनुसार ही संख्या वाढविली आहे. आतापर्यंत दररोज तीन ते चार हजार जणांना लशीचा पहिला डोस देण्यात येत होता. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत सहा हजार ४३ मुलांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.
या बाबत माहिती देताना शहर लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले, ‘‘शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने १५ ते १८ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींनी तातडीने लशीचा पहिला डोस घ्यावा. या सर्व मुलांना कोव्हॅक्सिन लशीचा डोस देण्यात येत आहे. या सर्व केंद्रांवर ५० टक्के लस ‘ऑनलाइन’ नोंदणी करून आणि ५० टक्के लस ‘ऑन दि स्पॉट’ जागेवर जाऊन घेता येणार आहे. ही लस सुरक्षित आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र मुला-मुलींनी ही लस घ्यावी.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT