पुणे

पुणे शहरात आजपासून बूस्टर डोस

CD

पुणे, ता. ९ : तुम्ही वयाची साठी ओलांडली आहे का? तुम्हाला मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार हे किंवा तत्सम विकार आहेत का? आणि तुम्हाला दुसरा कोरोना प्रतिबंध लशीचा डोस घेऊन नऊ महिने झाले आहेत का? या तिनही प्रश्नांची उत्तर ‘हो’ असल्यास तुम्ही लशीचा तिसरा डोस (बूस्टर डोस) घेण्यास पात्र आहात. तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्रावर येत्या सोमवारपासून (ता. १०) हा डोस तुम्हाला घेता येईल.
कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा प्रचंड वेगाने वाढू लागली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने संपूर्ण देशात सोमवारपासून ‘बूस्टर डोस’ देण्याची मोहीम सुरू हाती घेतली आहे. त्याला केंद्र सरकारने ‘प्रिकॉशनरी डोस’ असे म्हटले आहे. पुणे महापालिकेतही उद्यापासून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले, ‘‘आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वय आणि सहव्याधी असलेल्या नागरिकांना उद्यापासून तिसरा डोस देण्यात येणार आहे. शहरातील वेगवेगळ्या १७९ लसीकरण केंद्रांवर ही लस देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यापैकी आपल्या जवळच्या कोणत्याही लसीकरण केंदावर जाऊन ज्येष्ठ नागरिकांना लस घेता येईल. ज्येष्ठ नागरिकांनी फक्त कोणती सहव्याधी आहे, हे केंद्रावर सांगायचे आहे. त्याचे कोणतेही प्रमाणपत्र केंद्रावर सादर करावे लागणार नाही.’’
‘ज्येष्ठ नागरिकांनी दुसरा डोस घेऊन नऊ महिने झाले पाहिजे. लशीच्या दुसऱ्या डोसनंतर नऊ महिने झालेले, ६० पेक्षा जास्त वय आणि सहव्याधी असे तिसऱ्या ‘प्रिकॉशनरी डोस’चे निकष केंद्र सरकारने निश्चित केले आहेत,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
शहरात १५ ते १८ वर्षे वयोगटासाठी १७९ लसीकरण केंद्रांवर कोव्हॅक्सिन ही लस देण्यात येत आहे. शहरात १८ पेक्षा जास्त वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी १० ठिकाणी कोव्हॅक्सिन उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे दुसरा डोस राहिलेल्या नागरिकांना तेथे घेता येईल,’’ असेही डॉ. देवकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT