पुणे

गृह विलगीकरणात घाबरू नका; अशी घ्या स्वतःची काळजी!

CD

पुणे, ता. १० : तुमची टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आलीय, पण घाबरू नका. मात्र, स्वतःची आणि कुटुंबीयांची काळजी घ्या. कारण, सध्या कोरोनाबाधित होणाऱ्या ९५ टक्के रुग्णांना सौम्य किंवा कोणतीच लक्षणे नाहीत. त्यामुळे पॅरासिटमॉल, क्षारयुक्त पाणी (मीठ-साखर पाणी) आणि विश्रांती ही कोरोनाबाधितांवरील उपचाराची त्रिसूत्री आहे.
कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वेगाने वाढू लागली आहे. ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असल्याचे काही वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. या पार्श्‍वभूमिवर कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येणाऱ्यांनी कधी काय करावे, याचे सविस्तर मार्गदर्शन केंद्रीय आरोग्य खात्याने नव्याने केले आहे.

कोरोनाचा टेस्ट कधी करावी?
- तुम्हाला ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे ही लक्षणे असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने टेस्ट करा
- कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आला असल्यास
- घरातील कोणालाचीही टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्यास
- परदेश प्रवास करून आलेल्या प्रवाशांनी

टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर काय करावे?
- कोरोनाचे निदान झाल्यानंतर घाबरून जाऊ नका, संयम राखा
- योग्य डॉक्टरांशी किंवा महापालिकेच्या रुग्णालयाशी संपर्क साधा
- तुम्हाला ताप आहे का? तो किती आहे हे पहा
- ऑक्सिजनची पातळी कितीपर्यंत स्थिर राहते, हे तपासा
- त्यावेळी ऑक्सिमीटरवर हृदयाचे ठोके बघा

गृह विलगीकरण (होम आयसोलेशन)
- सौम्य लक्षणे असणाऱ्या किंवा कोणतेही लक्षण नसणाऱ्यांनी घरातच विलगीकरण व्हा
- गृह विलगीकरण किमान सात दिवसांचे असेल
- या दरम्यान थर्मामिटरने दिवसातून किमान तीन वेळा ताप बघा
- ऑक्सिजनची पातळी तपासा
- उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी फोनवरून सातत्याने संपर्कात रहा
- फारशी लक्षणे नसल्याने पॅरासिटमॉल, क्षारयुक्त पाणी व विश्रांती ही त्रिसूत्री प्रभावी ठरते

गृह विलगीकरणातून बाहेर कधी पडायचे?
- कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यापासून सात दिवसांचे गृह विलगीकरण आहे
- शेवटचे सलग तीन दिवस ताप आला नसेल तरच सात दिवसांनंतर गृहविलगीकरण संपेल
- कोरोनाची लक्षण पूर्णतः कमी होणे आवश्यक
- ऑक्सिजनची पातळी ९३ टक्क्यांपेक्षा जास्त असली पाहिजे
- सात दिवसांनंतर पुन्हा कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही

विलगीकरण संपल्यावर काय करायचे?
- पुढील सात दिवस रुग्णांनी स्वतःच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष द्यावे
- घराबाहेर पडल्यावर सातत्याने मास्कचा वापर करावा
- परत कोरोनाची लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या

हे करा
- उकळून गार केलेले पाणी प्या
- लिंबूवर्गिय फळ आहारात घ्या
- पुरेशी झोप घ्या

हे करू नका
- विनाकारण घराबाहेर पडू नका
- तेलकट पदार्थ खाणे टाळा
- शिळे अन्नपदार्थ खाऊ नका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: अर्शदीप सिंग ५ व्या T20I मधून बाहेर होणार? हैदराबादमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये असं नेमकं काय घडलं; सविस्तर जाणून घ्या

Mohol Crime : मोहोळ येथे चार लाख चौसष्ट हजाराची सुगंधी तंबाखु जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Shirur Crime : अपहार केल्याप्रकरणी टपाल खात्याच्या डाकपालाविरूद्ध गुन्हा दाखल; डाकपाल फरार

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 ऑक्टोबर 2026

IND vs WI 4th T20I : वेस्ट इंडिजने हैदराबादचं मैदान मारलं, भारताला पराभूत करत मालिकेत बरोबरी; सॅमसनची फिफ्टी व्यर्थ

SCROLL FOR NEXT