पुणे

गुन्हे वृत्त

CD

गुन्हे वृत्त

चिखलीत चायनीजच्या बिलावरून
एकाला बेदम मारहाण

पिंपरी, ता. १४ : चायनीज खाल्ल्यानंतर बिल न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाला बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार चिखली येथे घडला. याप्रकरणी मलम्माबाई शरणप्पा बिरुणगी (रा. सिंहगड कॉलनी, अष्टविनायक चौक, मोरे वस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित वाबळे व त्याचे तीन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचा मुलगा विलास याने मंगळवारी (ता. ११) रात्री आठच्या सुमारास आरोपी वाबळे याच्या चायनीज गाडीवर खाल्ले. त्यानंतर वाबळे याने पैसे मागितले असता फिर्यादीच्या मुलाने पैसे दिली नाही. याचा राग आल्याने आरोपींनी विलास यास मारहाण करण्यास सुरूवात केली. दरम्यान, तो घाबरून पळून जाऊ लागला असता त्याचा पाठलाग करून टॉवर लाईन येथील साई हौसिंग सोसायटी येथे त्याला दगडाने मारहाण केली. यामध्ये त्याच्या डोक्याला, पायाला दुखापत झाली. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून अधिक तपास सुरू आहे.


महिलेवर अत्याचार; एकावर गुन्हा

महिलेवर लैंगिक अत्याचार करून अश्लील व्हिडिओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार मानतेश नाईकोडे (रा. गुलबर्गा, विजापूर, कर्नाटक ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादीशी जवळीक वाढवून जबरदस्तीने शारीरिक सबंध ठेवले. त्यांचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढले. फिर्यादीने शारीरिक संबंधास नकार दिला असता त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. अश्लील फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची तसेच फिर्यादीच्या मुलाला व पतीला जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मामुर्डीमध्ये मारहाण करून रोकड लुटली

शिवीगाळ, दमदाटी करीत कमरेच्या पट्ट्याने मारहाण करून तरुणाकडील रोकड लुटली. हा प्रकार मामुर्डी येथे घडला.
याप्रकरणी सूरज श्रीधर शेट्टी (रा. हॉटेल पुन्हा गेट कॅम्पस, जुना मुंबई-पुणे महामार्ग, भक्ती-शक्ती चौक, निगडी ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय तुकाराम उदगीरे (वय २६, रा. अंकुश चौक, ओटास्कीम, निगडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी हे सोमवारी (ता. १०) रात्री साडे नऊच्या सुमारास मामुर्डीतील साईनगर येथे असताना वाहनातून आरोपी तेथे आला. जेवणाचे एवढे बिल का लावले, असे म्हणत फिर्यादी याला शिवीगाळ व दमदाटी करीत कमरेच्या बेल्टने मारहाण केली. यामध्ये त्यांना दुखापत झाली. त्यानंतर फिर्यादी यांच्या पॅन्टच्या खिशातील एक हजारांची रोकड आरोपीने जबरदस्तीने काढून घेतली. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

विवाहितेच्या छळप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा

विवाहितेसह तिच्या मुलाचा सांभाळ करण्यास नकार देत दोघांना घरातून हाकलून दिले. वेळोवेळी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती फैजान जावेद जमादार (वय ३०), सासू कमरुनिस्सा जावेद जमादार (वय ६१), नणंद सबा अन्सारी (वय ३३), काका सोहेल मेहबूब जमादार, परवेझ मेहबूब जमादार (सर्व रा. येरवडा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घरगुती कारणांवरून आरोपींनी फिर्यादी यांना वेळोवेळी मारहाण करून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. फिर्यादीसह त्यांच्या मुलाचा सांभाळ करण्यास नकार देत दोघांना घरातून हाकलून दिले. हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Fire Accident : पाच मजली इमारतीला सकाळी अचानक लागली आग, एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी

सारा अली खानला केदारनाथमध्ये येण्यास बंदी! मंदिर प्रशासनाचा निर्णय, म्हणाले...'ती स्वत:ला सनातनी मानत असली तरी ती..'

Grandmother Rescue Story: राहुरीत भीषण आग; नातींना वाचवण्यासाठी आजीची ज्वाळांत उडी, जीवावर बेतलं धाडस, नेमकं काय घडलं!

EV कडे वाढता कल, पण सुरक्षिततेचा मोठा प्रश्न! दुर्घटनेनंतर मंत्र्यांचा इशारा; चार्जिंगला लावून झोपलेल्या कुटुंबातील 8 जण जिवंत जळाले

SCROLL FOR NEXT