पुणे

‘मराठा समाजाच्या कल्याणासाठी लढणार’ माजी मंत्री सावंत यांचा जिजाऊरत्न पुरस्काराने सन्मान

CD

पुणे, ता. १२ ः जिजाऊंनी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार केले. त्यांच्या विचारांनी संपूर्ण विखुरलेला मराठा समाज एकत्र करण्याचे कार्य झाले. तोच विचार मनात ठेवून सर्व मराठा संघटनांना एकत्र करून मराठा आरक्षण आणि समाजाच्या अडचणींसाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहील, असा शब्द जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री व आमदार तानाजी सावंत यांनी बुधवारी दिला.

मराठा सेवा संघ, पुणे शहरतर्फे ३ जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती ते १२ जानेवारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंतीपर्यंत दशरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सावंत यांना जिजाऊरत्न पुरस्काराने तमिळनाडूतील तंजावर येथील व्यंकोजीराजे यांचे थेट वंशज विजयराजे भोसले यांचे हस्ते गौरवण्यात आले. या वेळी पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या प्रसंगी योगाचार्य शिवमती सुमन कुसळे यांना जिजाऊ स्मृती सन्मानाने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन लाल महाल येथे करण्यात आले होते. नगरसेवक योगेश समेळ, नाना निवंगुणे, नीता रजपूत, सीमा महाडिक, हर्षवर्धन मगदूम, राजेंद्र बलकवडे, अनसूया गायकवाड, वंदना इंदापूरकर, आरती घुले, नंदा कवळे, प्रफुल्लता वडके, स्वाती अंदुरे, डॉ. चंद्रकांत कुंजीर, अण्णा तळेकर आदी उपस्थित होते.

या प्रसंगी विजयराजे भोसले यांनी मराठा सेवा संघाच्या कार्याचे कौतुक केले. संघाचे शहराध्यक्ष सचिन आडेकर व मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य राजेंद्र कुंजीर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

Navi Mumbai: मुलगा घरी एकटाच, पालक घरी येताच समोर जे दिसलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली, नवी मुंबईत काय घडलं?

IPL सारखीच नवी टी२० स्पर्धा, 'या' क्रिकेट बोर्डानं केली घोषणा; सुरुवात कधी?

IPL 2026 Video: धोनी वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत खेळणार? थालाचं उत्तर ऐकून आख्ख्या स्टेडियममध्ये जल्लोष

अमेरिकेचं एक पाऊल मागे, युद्धाला ब्रेक! इराणसोबत सकारात्मक चर्चा, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT