पुणे

स्वारगेट बस स्थानकातून पुन्हा खासगी बस सुरू

CD

पुणे, ता. १२ : स्वारगेट स्थानकातून खासगी बस चालकांना मंगळवारी अचानक प्रवासी वाहतुकीस बंदी घालण्यात आली होती. त्यावर चालकांनी संताप व्यक्त केला होता. एसटी प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत पुन्हा स्थानकातून प्रवासी वाहतुकीची विनंती केली. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून आज (ता. १२) संध्याकाळी ६ वाजल्यापासून पुन्हा स्थानकातून खासगी बस मधून प्रवासी वाहतूक सेवा सुरु करण्यात आली. असे राज्य प्रवासी व मालवाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले.
पुन्हा प्रवासी वाहतूक सुरु करावी, यासाठी प्रशासनाने खासगी बस मालकांना बैठकीसाठी बोलावले होते. बैठकीत प्रशासनाने दिलगिरी व्यक्त करताच पुन्हा प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य व पुणे बस असोसिएशनचे पदाधिकारी शिवराज थोरात व निखिल भोसले उपस्थित होते, असे शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, एसटी महामंडळाचे १७ कर्मचारी बुधवारी (चालक, वाहक) कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे एसटी बससेवेला गती मिळणार आहे. अजूनही कर्मचारी कामावर हजर होणार आहेत. १५ कंत्राटी चालक या पूर्वीच कामावर हजर झाले आहेत, असे ज्ञानेश्वर रणवरे यांनी सांगितले.

खासगी बस व्यवसायिकांची आज बैठक घेण्यात आली. बैठकीत आरटीओचे अधिकारीही उपस्थित होते. स्थानकात गर्दी होऊ नये म्हणून सोलापूर फलाटावर खासगी बस गाड्यांना जागा देण्यात आली आहे.
-ज्ञानेश्वर रणवरे, विभागीय वाहतूक अधिकारी.

स्वारगेट स्थानकातून अद्याप एकही कर्मचारी कामावर हजर झाला नाही. स्वारगेट स्थानकात एकूण १३५ कर्मचारी आहेत. त्यापैकी कोणता कर्मचारी कामावर हजर झाला, हे प्रशासनाने दाखवून द्यावे. प्रशासन खोटे दावे करत आहे.पुणे विभागातील सर्वच कर्मचारी दुखवट्यात सहभागी आहेत.
-संजय मुंडे, एसटी कर्मचारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT