पुणे

महापालिकेत नाकाबंदी पण सुरक्षा रक्षकांची तारांबळ

CD

पुणे, ता. १२ : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना देखील महापालिकेत किरकोळ कामासाठी येणाऱ्या नागरिकांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होत आहे. आजपासून (ता.१३) या सर्वांना प्रवेश बंदी केली. केवळ अत्यावश्यक कामासाठी येणारे नागरिक नगरसेवक व कर्मचाऱ्यांना महापालिकेत प्रवेश दिला जात होता. अचानक महापालिकेचे दारे बंद झाल्याने नागरिकांची गर्दी नियंत्रित करताना व त्यांची समजूत घालताना सुरक्षारक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली.

गेल्या काही दिवसांपासून शहरात रोजचा कोरोना बांधितांचा आकडा हजाराच्यावर आहे. शासनाने गर्दी टाळण्यासाठी निर्बंध लावले आहेत. सर्व कार्यक्रमांच्या उपस्थितीवर बंधन आले आहे. शासकीय कार्यालये ५० टक्के उपस्थितीमध्ये सुरू आहेत. पुणे महापालिकेनेही हे निर्बंध लागू केले आहेत. पण, महापालिकेचे मुख्य भवन आणि क्षेत्रिय कार्यालय येथे मोठी गर्दी होत आहे. पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या केबिन बाहेर नागरिकांच्या रांगा लागत आहेत. ही गर्दी टाळण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी स्वतंत्र आदेश काढलेत. अत्यावश्‍यक कामा शिवाय महापालिकेच्या मुख्य इमारत, परिमंडळ कार्यालय, क्षेत्रीय कार्यालयांमध्ये लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांच्या शिवाय कोणालाही प्रवेश देऊ नये.
जे नागरिक सुनावणी किंवा पूर्वनियोजित कामासाठी येणार आहेत. त्यांना पास देण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश १० जानेवारी रोजी दिले असेल तरी त्याची अंमलबजावणी महापालिकेत आजपासून केली. महापालिकेच्या जुन्या इमारतीच्या बाजूने अत्यावश्यक कामातील नागरिकांना प्रवेश दिला जात होता. तर नवीन इमारतीच्या गेटमधून केवळ नगरसेवक, पदाधिकारी यांना प्रवेश होता. हे गेट बंद झाल्याने नागरिकांनी सुरक्षा रक्षकांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. कार्यकर्त्यांनी देखील नगरसेवकांना फोन करून दबाव आणण्यास सुरुवात केली. यातून सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्ते यांच्यात वादही झाले.

वशिल्याची गर्दी
सकाळी महापालिकेत नियमाची कडक अंमलबजावणी सुरु असती तरी दुपारनंतर अनेक कार्यकर्ते नगरसेवकांसोबत पालिकेत आले. तसेच ठेकेदारांसोबतही अनेकजण पालिकेच्या इमारतीमध्ये आले. त्यामुळे पुन्हा एकदा पालिका भवनात गर्दी दिसून आल्याने प्रशासनाच्या आदेश केवळ कागदावरच राहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Recruitment : पोलिस भरतीत ‘शॉर्टकट’चा स्फोट! शक्तीवर्धक पेय घेताच उमेदवाराचा मैदानावर धिंगाणा, थरारक क्षणांनी सर्वच शॉक

Bullet Rider Assaults Traffic Police in Solapur : लायसन्स, नंबरप्लेट नाही, मॉडिफाइड सायलेन्सर, तरीही पोलिसाला खल्लास करण्याची दिली धमकी

Latest Marathi News Live Update : सातारा जिल्हा परिषदेत बहिष्कार; सभापती निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

IPL 2026: ऋतुराज गायकवाडला संजू सॅमसनमुळे CSK संघात जाणवतोय धोका? माजी कर्णधाराचा खळबजनक दावा

Gemma 4 : इंटरनेटची गरज संपली! गुगलने लॉन्च केले Gemma 4; आता डेटा संपला तरी मोबाईल चालेल सुपरफास्ट, कसं वापरायचं पाहा

SCROLL FOR NEXT