पुणे

‘रिक्षाचालकांची परिस्थिती समजून घ्या’ ‘टॅक्सी-बाइक’ सेवेच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी मांडली व्यथा

CD

पुणे, ता. १३ ः कोरोनामुळे रिक्षाचालकांवर वाईट दिवस आले आहेत. रस्त्यावर गर्दी दिसत असली, तरी त्या प्रमाणात प्रवासी नाहीत. सकाळी सात वाजता घरातून निघालो होतो, चार वाजेपर्यंत केवळ एकशे वीस रुपयांचा धंदा झाला आहे. एवढ्या कमाईतून साधा खर्चही वसूल झाला नाही. त्यात टॅक्सी-बाइकचालक वाढले आहेत. बॅंकेचा हप्ता कसा भरायचा हा प्रश्नच आहे. रिक्षाचालकांनाही त्याचे कुटुंब आहे. आमची परिस्थिती समजून घ्या, असे अल्ताफ शेख या रिक्षाचालकाने सांगितले.

सध्या टॅक्सी-बाइक ॲप आणि रिक्षा वाद सुरू आहे. ही सेवा बेकायदेशीर असून, त्यावर बंदीच घातली पाहिजे, अशी रिक्षाचालकांची मागणी आहे. यानिमित्ताने रिक्षाचालकांनी आपल्या व्यथा व्यक्त केल्या. दिवसभरात धंदा करून घरी जाताना मुलाबाळांना काही तरी खाऊ घेऊन जाण्याची आमची अपेक्षा असते. मात्र, अनेकवेळा धंदाच होत नाही. घरखर्च, बॅंकेचे हप्ते, शिक्षणाचा खर्च भागविण्याचा ताण आहे. जे कायदेशीर आहे, त्याला संरक्षण दिले पाहिजे, असे रिक्षाचालक महेश पांढरे यांचे म्हणणे आहे.

टॅक्सी-बाइक बेकायदा आहेत. हे मंत्र्यांपासून सर्व अधिकाऱ्यांना मान्य आहे. ओला, उबर, रॅपिडो आणि झूम या कंपन्यांना बंद करण्याचे आदेशही दिले आहेत. मात्र, आरटीओच्या कार्यक्षेत्रात कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांचे कार्यालयदेखील माहीत नाही. तसेच त्यांचे अधिकारी आरटीओलासुद्धा प्रतिसाद देत नाहीत. गेल्या वर्षभरापासून २० हजारपेक्षा जास्त बेकायदा टॅक्सी-बाइक सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवण्यासोबतच प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आणत आहेत. टॅक्सी-बाइकमुळे लाखो रिक्षाचालकांचे उत्पन्न निम्म्याहून कमी झाले आहे. अनेक बेरोजगार युवकांना फसवून या धंद्यात आणून त्यांच्या टॅक्सी-बाइक जप्त झाल्यावर हात वर करत आहेत. आरटीओने त्या टॅक्सी-बाइक बंद कराव्यात, असा आदेश सायबर गुन्हे विभागाला दिला आहे. आता मात्र सायबर गुन्हे विभाग ते काम आरटीओचे आहे, आमचे नाही असे म्हणत आहे. असे ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव (नाना) क्षीरसागर यांनी सांगितले.

बहिणीच्या वाढदिवसासाठी साठवलेले पैसे गॅससाठी
रिक्षामध्ये गॅस भरण्यासाठी पैसे नाहीत. असा सुरू असलेला संवाद मुलाने ऐकल्याने त्याने त्याच्या लहान बहिणीच्या वाढदिवसासाठी साठवलेले पैसे हातात ठेवले. पर्याय नसल्याने नकारही देता आला नाही. त्याने पैसे दिले म्हणून तरी गॅस भरता आला आणि रात्रीचे जेवण करता आले. हे सांगताना विकास वाघमारे या रिक्षाचालकाला अश्रू अनावर झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! महाराष्ट्रासह 21 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 85 किमी वेगाने वाहणार वारे; माॅन्सून परतण्यापूर्वी वाढणार चिंता

IND VS AFG 3RD T20I: २० चेंडूंत १०२ धावा... Abhishek Sharma ने ट्वेंटी-२०चा इतिहास-भूगोल बदलला! एक नव्हे अनेक विक्रम मोडले, सेलिब्रेशन तर भारीच केले Video Viral

Tarapur Leopard Scare: तारापूर-चिंचणी परिसरात बिबट्याला गुरांचा चोप; नागरिकांमध्ये भीती, वनविभागाकडे जेरबंदाची मागणी

Latest Marathi News Update : वाशिम-कारंजा मार्गावर CNG गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील सिलेंडरचा स्फोट; जीवितहानी टळली

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

SCROLL FOR NEXT