पुणे

पुणे विभागातील ५९ एसटी कर्मचारी बडतर्फ

CD

पुणे, ता. १३ ः एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर तीव्र कारवाई केली जात आहे. बुधवार व गुरुवार या दोन दिवसांत पुणे विभागाने एकूण ५९ एसटी कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.

परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संपातून माघार घेऊन कामावर येण्याचे आवाहन केले आहे. मात्र, एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवाडी) आदी आगारांसह पुणे विभागातील १३ आगारांतील एसटी कर्मचारी संपात सहभागी आहेत. जे कामावर येण्यास इच्छुक असतील त्यांना कामावर घेतले जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी हजर व्हावे, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.

खासगी वाहतूक सुरळीत
एसटी प्रशासनाने खासगी बसला स्वारगेट स्थानकातून प्रवासी वाहतूक करण्यास बंदी घातली होती. त्यामुळे मंगळवारी वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र बुधवारी बैठकीत पुन्हा वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे गुरुवारी एसटी बस सेवेसह खासगी बस वाहतूकही सुरळीत सुरू झाली, अशी माहिती राज्य प्रवासी व मालवाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Loksabha Election 2024 : शांतीगिरी महाराजांमुळे तिढा वाढला ; नाशिकमध्ये शिवसेनेकडून अर्ज सादर केल्याचा दावा

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT