पुणे

दहा टक्क्याने व्याज उकळणाऱ्या सावकाराला बेड्या

CD

पुणे, ता. ३१ : कापड व्यावसायिकाला २० लाख रुपये व्याजाने देऊन १० टक्के दराने महिन्याला दोन लाख रुपयांचे व्याज वसूल करणाऱ्या सावकाराला पोलिसांच्या युनिट चारने अटक केले. किशोर सदाशिव खळदकर (वय ३८, रा. जातेगाव बुद्रुक, ता. शिरूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्या घरातून अडीच लाख रुपये, कोरे धनादेश, स्टॅम्प जप्त करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

 
कोरोनामुळे कापड व्यवसाय अडचणीत आल्याने तक्रारदारांनी जुलै २०२१ मध्ये खळदकरकडून २० लाख रुपये व्याजाने घेतले होते. व्याजाच्या रकमेपोटी प्रतिमहा १० टक्के दराने तो तक्रारदाराकडून महिन्याला दोन लाख रुपये व्याज उकळत होता. व्याज थकल्याने  खळदकरने तक्रारदाराला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती.
- - - - - --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Outsourced Hiring: आउटसोर्स भरती म्हणजे युवकांचे शोषण; हायकोर्टाचा मोठा निर्णय, सरकारी भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

T20I Record: क्रोएशियाच्या २३ वर्षीय फलंदाजाचा अविश्वसनीय वर्ल्ड रेकॉर्ड; IPL सोडा पठ्ठ्याने ३ सामन्यांत जगाचे लक्ष वेधले

‘बाप्या’मधील राजश्री देशपांडेच्या लूकची चर्चा शैलजापासून शैलेशपर्यंतचा प्रवास ठरतोय खास!

Mumbai: महागाई वाढता वाढे! दरवाढीच्या तव्यावर भाजी-पोळी केंद्रे होरपळली, ग्राहकसंख्येत घट; व्यावसायिक चिंतेत

मुंबईत कचरा व्यवस्थापनाचे नवे नियम लागू! आता ४ प्रकारांत करावे लागणार कचऱ्याचे वर्गीकरण, नियम तोडल्यास कारवाई होणार

SCROLL FOR NEXT