पुणे

‘पोलिस उपनिरीक्षक पदासाठीची लिंक कधी ओपन करून देणार’

CD

पुणे, ता. १५ : कोरोना तसेच मराठा आरक्षणामुळे गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा तसेच सरळसेवेची भरती प्रक्रिया राबविण्यात आली नव्हती. या काळात परीक्षेची संधी हुकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मागणीनुसार एका वर्षाच्या सवलतीचा निर्णय देण्यात आला आहे. त्यानुसार राज्यसेवा परीक्षेसह संयुक्त गट ब पूर्व परीक्षेतील सहायक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक या पदांसाठी अर्ज सादर करण्यासाठी संधी देण्यात आली आहे. मात्र पोलिस उपनिरीक्षक या पदासाठी अद्यापही लिंक ओपन करण्यात आली नसल्याने, लिंक कधी ओपन करून देणार असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

संयुक्त पूर्व परीक्षा २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पार पडावी असे वाटते. शासन आदेश काढला असला तरी जोवर अर्ज सादर करणार नाही, तोवर समाधान होणार नाही. वय वाढले आहे, संधी देखील आहे, मात्र अर्ज करता येत नाही, याचे दडपण आहे. त्यामुळे ‘एमपीएससी’ने तत्काळ पोलिस उपनिरीक्षक पदासाठी अर्ज करण्यासाठी लिंक ओपन करून द्यावी, अशी मागणी मनोज फडतरे या विद्यार्थ्यासह अनेक विद्यार्थ्यांनी केली आहे.

राज्यात पोलिस उपनिरीक्षक या पदासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांची संख्या लाखोंच्या घरात आहे. विद्यार्थी लिंक ओपन होण्याची वाट बघत आहेत. एका वर्षाची सवलत मिळणार असल्याने, अनेक विद्यार्थी अभ्यास करीत आहेत. मात्र याची अंमलबजावणी होत नसल्याने ते चिंतेत आहेत. एकदा सवलत मिळाली की, विद्यार्थ्यांमध्ये विश्वास येईल.
- प्रवीण दंडगुले, विद्यार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT