पुणे

पोस्टरमधून रिक्षाचालकांची उपमुख्यमंत्र्यांना साद

CD

पुणे, ता. १५ ः ‘काका मला वाचवा’ अशी आर्त हाक २५० वर्षानंतरसुद्धा पुणेकर विसरले नाहीत. तेव्हा कपटाने नारायणराव पेशवे यांना मारलं होतं, तसेच आता महाराष्ट्र शासनाचे अधिकारी छळ कपट करून १२ लाख रिक्षाचालकांना व ६० लाखांहून रिक्षा व्यावसायिकांच्या कुटुंबीयांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या भाबडेपणाने नारायणराव, रघुनाथराव यांना ‘काका मला वाचवा’ची साद घालत होते, त्याचप्रमाणे रिक्षाचालकांनी रिक्षावर ‘दादा मला वाचवा,’ असे पोस्टर लावून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साद घातली आहे. असे ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव (नाना) क्षीरसागर यांनी सांगितले.

टॅक्सी-बाइक आणि रिक्षाचालक यांच्यात वाद सुरू आहे. टॅक्सी-बाइक ही सेवा बंद करण्यात यावी, अशी रिक्षाचालकांची मागणी आहे. ४ जानेवारी रोजी रिक्षाचालकांच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरील धडकलेल्या विराट मोर्चानंतर अजित पवार यांनी एका आठवड्यात टॅक्सी-बाइक बंद करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप कारवाई झाली नाही. हे प्रादेशिक परिवहन विभागाने मान्य करून सायबर गुन्हे विभागाला ओला, उबर, रॅपिडो आणि झूम हे ॲप बंद करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, आता सायबर विभाग व आरटीओ हे काम आपले नाही म्हणत एकमेकांकडे बोटे दाखवत आहेत. या सगळ्यामध्ये रिक्षाचालकांचे अतोनात हाल होत आहेत. दिवसागणिक ५०० ते ७०० रुपयांचे रोज नुकसान होत असून, ९० टक्के उत्पन्न गेल्या आठवडाभरापासून कमी झाले आहेत. दिवसाला फक्त ५० ते १०० रुपयांचा धंदा होत आहे. अनेकांची तर बोहनीदेखील होत नाही. परंतु आजतागायत फक्त कागदोपत्री कारवाई झाली असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे ३० हजारांहून अधिक बेकायदा टॅक्सी-बाइक काम करत आहेत, असे क्षीरसागर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT