crime news system
पुणे

पुणे : महाविद्यालयीन युवकाच्या ब्लेडने भुवया कापल्या

महाविद्यालयीन युवकास मारहाण करून त्याच्या भुवया ब्लेडने कापण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

महाविद्यालयीन युवकास मारहाण करून त्याच्या भुवया ब्लेडने कापण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे - महाविद्यालयीन युवकास (Youth) मारहाण करून त्याच्या भुवया (Eyebrow) ब्लेडने (Blade) कापण्याचा (Cutting) प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रिझवान खलिल (रा. कागदीपुरा, कसबा पेठ) आणि साथीदार साहिल कुरेशी यांच्या विरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

याबाबत युवकाच्या वडिलांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सतरा वर्षीय युवक महाविद्यालयीन क्लासला जात होता. त्यावेळी आरोपी खलिल आणि कुरेशी यांनी युवकाच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. ‘तुझी शिकवणी वर्गात काय भानगड चालू आहे, हे माहीत आहे. हे प्रकरण आपण मिटवून टाकू,’ असे युवकाला आरोपींनी सांगितले.

युवकाला रास्ता पेठेतील महात्मा फुले चौकात भेटण्यासाठी बोलाविले. आरोपींनी युवकाला धमकावून त्याला शिवीगाळ केली. त्याला मारहाण केली. त्यानंतर कुरेशीने युवकाचे हात पकडून ठेवले, तर खलिलने ब्लेडने युवकाच्या भुवया कापल्या. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. घाबरलेल्या युवकाने या घटनेची माहिती वडिलांना दिली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून पोलिस उपनिरीक्षक सुरेश चौधर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: आई, मी चांगला मुलगा होऊ शकलो नाही... ; खाजगी व्हिडिओवरून ब्लॅकमेल झाल्यामुळे मुंबईत CA ने संपवले जीवन

Video : वाढदिवस ठरला शेवटचा..! केक कापताना घडली भयंकर घटना, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल..

कुटुंबात किती लोक? कोणत्या जातीचे आहात? आता संपूर्ण माहिती तुम्ही घरबसल्या सांगू शकणार; जनगणनेत दिसणार 'हा' पर्याय

Latest Maharashtra News Updates : विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवल्याने सरकार विरोधात विरोधकांचे पायऱ्यांवर आंदोलन

Polytechnic Admissions 2025: कोणते कॉलेज निवडू, कोणती शाखा निवडू ? पॉलिटेक्निक प्रवेशाकरिता काउंटडाऊन सुरू

SCROLL FOR NEXT