Gunratna Sadavarte Gunratna Sadavartes
पुणे

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला

महापुरुषांच्या वंशजांबद्दल आक्षेपार्ह विधान

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महापुरुषांच्या वंशजांबद्दल आक्षेपार्ह विधान करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवारी न्यायालयाने फेटाळला. अ‍ॅड. सदावर्ते यांच्या ७ ऑक्टोबर रोजी प्रसारित झालेल्या एका व्हीडिओमध्ये त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या प्रकरणी अमर पवार (वय ३५, रा. भारती विद्यापीठ) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

त्यामध्ये अ‍ॅड. सदावर्ते यांनी महापुरुषांच्या वंशजांचा एकेरी उल्लेख केला, तसेच विशिष्ट समाजाचा अपमान होईल, जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याने समाजाच्या भावना दुखावल्याचे फिर्यादीत म्हटले होते. दरम्यान, या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी सदावर्ते यांच्यावतीने न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. अतिरिक्त सरकारी वकील जावेद खान यांनी त्यास विरोध केला. त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात यावा, अशी विनंती केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी जामीन फेटाळल्याचा आदेश दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: LPG सिलेंडर महागला, मग पेट्रोल-डिझेलचे काय? महिन्याच्या सुरुवातीलाच नवे दर जाहीर; महाराष्ट्रात कितीला मिळतंय?

Kunbi Caste Certificate Invalidity Case: कुणबीत जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्यांना आणखी एक धक्का! आता थेट हायकोर्टातच अंतिम सुनावणी होईल

करोडोंची संपत्ती, पण प्रवास रिक्षातून! रजनीकांत यांच्या साधेपणाने जिंकली चाहत्यांची मनं; Video चर्चेत

Toll Hike: मुंबईच्या प्रवेशद्वारांवर आजपासून टोल 'भार', पाचही नाक्यांवर २० टक्के दरवाढ; आता किती द्यावा लागणार टोल?

Latest Marathi News Live Update : अमरावती-बडनेरा शहराचा आज पाणीपुरवठा बंद

SCROLL FOR NEXT