पुणे

ज्येष्ठांसाठी मोफत बूस्टर डोस मोहीम

CD

पुणे, ता. १८ ः कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका विचारात घेऊन, पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या वतीने व ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या माध्यमातून पुणे शहर परिसरातील साठ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी २० जानेवारी ते २० फेब्रुवारीपर्यंत, सोमवार ते शनिवार सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मोफत बूस्टर डोस लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेच्या माध्यमातून किमान दहा हजार ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती पूना हॉस्पिटल ट्रस्टचे अध्यक्ष देविचंदजी जैन, व्यवस्थापकीय विश्‍वस्त राजकुमार चोरडिया, सहव्यवस्थापकीय विश्‍वस्त पुरुषोत्तम लोहिया व ‘सकाळ रिलिफ फंड’चे समिती सदस्य राजेश शहा यांनी दिली.

ज्या नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लशीचे (कोव्हिशिल्ड) दोन डोस पूर्ण होऊन, नऊ महिने पूर्ण झाले आहेत, अशा व्यक्ती या मोहिमेत सहभागी होऊ शकतात. मोहिमेअंतर्गत दररोज किमान दोनशे लोकांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे. पुणे शहर परिसरातील वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकसुद्धा या मोहिमेचा लाभ घेऊ शकतात, याकरिता वृद्धाश्रम प्रशासनाला ज्येष्ठ नागरिकांच्या वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करावे लागेल.

मोफत लसीकरणासाठी खाली दिलेली लिंक ओपन करून, ज्येष्ठ नागरिकांनी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बूस्टर डोससाठी येताना आधार कार्ड, ओटीपीसाठी मोबाईल व दोन डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र घेऊन येणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ः ८६०५०१७३६६ (१० ते ५).

नावनोंदणीसाठी लिंक किंवा सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करा :
www.sakalsocialfoundation.com/booster-dose.php

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT