ahmednagar fire sakal
पुणे

नगर रुग्णालय अग्नितांडव : 'कार्यवाही न करता केवळ कागदी घोडे नाचविले'

CD

पुणे, ता. १९ : जिल्हा रुग्णालय नगर येथील कोविड अतिदक्षता विभागामध्ये (आयसीयू) लागलेल्या आगीबाबतचा अहवाल समितीने सादर केला आहे. मात्र, या अहवालातील माहिती सरकारकडून लपविली जात आहे. तसेच, यावर पुढे कोणतीही कार्यवाही न करता केवळ कागदी घोडे नाचविले जात आहेत, असा आरोप करून नगर येथील जळीत हत्याकांडाची जबाबदारी कोण घेणार? हा प्रश्न अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. प्राची साठे आणि न्याय वैद्यकीय सल्लागार डॉ. राजीव जोशी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. (Ahmednagar fire hospital)

या आगीत १२ रुग्णांचा दुदैवी मृत्यू झाला, तर पाच रुग्ण जखमी झाले. या घटनेला जबाबदार नसतानाही डॉ. विशाखा शिंदे यांना अटक केली, त्यांना पोलिस आणि न्यायालयीन कोठडीत अमानवी वागणूक देण्यात आली. त्यांच्या मानवी हक्कांची पायमल्ली झाली, असे डॉ. शिंदे यांनी न्यायालयाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. यावरून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी डॉ. साठे आणि डॉ. जोशी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. डॉ. साठे म्हणाल्या, ‘‘डॉ. शिंदे अपघाताला जबाबदार नव्हत्या. त्यांना आग विझविण्याचे कोणतेही प्रशिक्षण दिले नव्हते, तरीसुद्धा त्यांनी रुग्णांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. आग लागण्यात त्यांचा कोणताही दोष नसताना, त्यांना बेकायदा अटक झाली.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT