पुणे

क्राइम

CD

तरुणीचे न्यूड फोटो
व्हायरलकरून केली बदनामी

पुणे, ता. ५ : पत्नीबरोबर घटस्फोट झाला असून ती पैशासाठी माझ्याबरोबर राहते, असे खोटे सांगून तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले. तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले व पत्नीच्या मदतीने तिचे न्यूड फोटो काढून व्हॉटसअॅपवर व्हायरल करून बदनामी केल्याच्या आरोपाखाली एकावर आणि त्याच्या पत्नीवर चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी पाषाण येथील एका २७ वर्षाच्या तरुणीने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्यादीनुसार विशाल गायकवाड (वय ४७, रा. पॅराडाईज व्हिला, एनआयबीएम रोड, कोंढवा) व त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २०१८ पासून २ फेब्रुवारी दरम्यान टर्फ क्लब हाऊस, कॅम्प व पाषाण येथील फिर्यादीच्या घरी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीचे व्यवसायामध्ये गुंतवणुक करायची आहे, असे म्हणून त्यांच्याशी जवळीक साधली. त्याने त्यांची पत्नी हिचेबरोबर पटत नसून आमचा घटस्फोट झाला आहे. ती फक्त माझ्यासोबत पैशांसाठी राहते असे खोटे सांगितले. फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करून वेळोवेळी तिच्या संमतीशिवाय तिच्याबरोबर जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. माझ्यासोबत राहिली नाहीस तर ‘मी तुला मारुन टाकीन’ अशी धमकी दिली. फिर्यादी यांच्या लाँड्रीच्या दुकानात येऊन तेथील कामगारांना बाहेर काढून येथे कोणी काम करायचे नाही, अशी धमकी दिली. फिर्यादीचे लग्नानंतर तिच्या पतीला आरोपी व त्याच्या पत्नीने फिर्यादी व आरोपी विशाल गायकवाड यांचे न्यूड फोटो तसेच फिर्यादीस मारहाण करतानाचे फोटो व्हॉटसअॅप करून फिर्यादीची बदनामी केली. फिर्यादीने तक्रार दिली तर जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देऊन हाताने तसेच कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक कोळी तपास करीत आहेत.


लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका तरुणाला लुटले
पुणे, ता. ५ ः लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून नेल्यानंतर मारहाण करत एका तरुणाला चौघांनी लुटले. ही घटना ३ फेब्रुवारी रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास मंतरवाडी चौक ते हांडेवाडी चौक परिसरात घडली. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. प्रथमेश काळे (वय २१, रा. फुरसुंगी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चार अनोळखी दुचाकीस्वार आरोपींच्या विरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण रस्त्याने पायी चालत निघाला होता. त्यावेळी एकाने त्याला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवले. काही अंतर पुढे गेल्यानंतर चौघा आरोपींनी त्याला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. तसेच एका व्यक्तीने हत्याराच्या धाकाने जीवे ठार करण्याची धमकी देऊन रोकड व मोबाईल असा १५ हजार ४०० रुपयांचा किमती ऐवज जबरदस्तीने हिसकावला. त्यानंतर आरोपींनी पळ काढला. पुढील तपास हडपसर पोलिस करत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MHADA: म्हाडाची पुन्हा लाॅटरी निघणार! ‘पीएमजीपी’तून मिळणार ९०० घरे, पन्नास टक्के जागेवर उभारणार सदनिका

आखाती युद्धाचा पर्यटनाला फटका! महिन्याभरापासून विमानसेवा विस्कळीत, ट्रॅव्हल एजन्सीतील प्रवाशांचे बुकिंग रद्द

Solapur Mangalevedha news: ‘बसव ज्योत’ सायकल यात्रेचे मंगळवेढ्यात जल्लोषात स्वागत; महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी जनजागृतीला वेग

Pune Ambegaon gas crisis: आंबेगावच्या पूर्व भागात गॅस पुरवठा ठप्प; ६० हजारांहून अधिक ग्राहक त्रस्त, उत्तर प्रदेश-बिहारमधील कुटुंबे परतगावी

IPL 2026, SRH vs LSG: रिषभ पंतच्या अर्धशतकाने लखनौने विजयाचं खातं उघडलं; रोमांचक सामन्यात काव्या मारनच्या हैदराबादचा घरात पराभव

SCROLL FOR NEXT