पुणे

पीएनजी ज्वेलर्सचा ​ऑगमाँटबरोबर करार ग्राहकांना डिजिटल सोने खरेदी-विक्री करणे शक्य

CD

पुणे, ता. २१ : तब्बल १८९ वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या पीएनजी ज्वेलर्सतर्फे ग्राहकांसाठी डिजिटल गोल्ड सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेद्वारे www.pngjewellers.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून ग्राहकांना डिजिटल सोने खरेदी आणि विक्री करणे शक्य होणार आहे. यासाठी ब्रँडने डिजिटल गोल्ड क्षेत्रात अग्रणी असलेल्या ऑगमाँटबरोबर करार केला आहे. डिजिटल गोल्ड सुविधेमुळे वास्तविक सोने व चांदी बुलियन ऑनलाइन उपलब्धततेच्या सोईस्कर मार्गाने व अगदी एक रुपयापासून खरेदी करता येणार आहे. त्यानंतर खरेदी केलेली नाणी किंवा बार्सच्या डिलिव्हरीसाठी ग्राहक हवी तेव्हा विनंती करू शकतात.

ऑनलाइन व्यवहाराची तीच लिंक वापरून ग्राहक सुरक्षित व सोईस्कर पद्धतीने बुलियनची विक्री करू शकतात. खरेदी आणि विक्रीचे दर होलसेल स्पॉट रेटवर आधारित असूनही व्यवहार्य आहेतच; पण त्याचबरोबर इतर सेवा पुरवठादारांच्या तुलनेत स्पर्धात्मकदेखील आहेत. याशिवाय ग्राहक आपल्या स्नेहींना कुठल्याही समारंभासाठी सोने किंवा चांदी भेट देऊ शकतात. यासाठी ज्यांना भेट द्यायची आहे किंवा प्राप्तकर्त्यांकडे सक्रिय मोबाईल क्रमांक असण्याची गरज आहे. प्राप्तकर्त्याने ही भेट ७ दिवसांच्या आत स्वीकारायची असून, ती न केल्यास ग्राहकाच्या वॉलेटमध्ये ही खरेदी पुन्हा ठेवली जाते.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत ‘पीएनजी’तर्फे ग्राहकांच्या सुरक्षितता आणि सुविधेसह विविध उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्याकरिता ब्रँडतर्फे नियमित ऑनलाइन पद्धतीने गुंतवणुकीबाबत चर्चा आयोजित करण्यापासून ते घरबसल्या दागिने खरेदीचा पर्याय देण्यापर्यंतचे सर्व उपक्रम राबविण्यात आले. काही निवडक दालनांमध्ये आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम यशस्वी ठरल्यानंतर डिजिटल गोल्ड उपक्रम सुरू करणे, ही स्वाभाविक बाब ठरली.

‘‘ऑगमाँटच्या सहकार्याने पीएनजी ज्वेलर्सतर्फे सुरू करण्यात आलेले डिजिटल इंटरफेस ग्राहकांसाठी सोईस्कर खरेदी-विक्रीचा अनुभव देते. गेल्या दोन वर्षांत ग्राहकांमध्ये ई-कॉमर्सबाबत जागरूकता वाढली असून, त्यामुळे डिजिटल गोल्डसाठी व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. सोने खरेदी-विक्रीसाठी ही मोठी संधी आहे.’’
- डॉ. सौरभ गाडगीळ, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएनजी ज्वेलर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

Pali News : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार शोधण्यासह इतर मागण्यांचे तहसीलदारांना अंनिसकडून निवेदन

School Blast: शाळेबाहेर स्फोटके! विद्यार्थ्याने फेकताच भीषण स्फोट, महिला आणि विद्यार्थी जखमी

Maharashtra Latest News Update: मंडणगडमधील महावितरणच्या जागेतील खैराची पुन्हा चोरी

SCROLL FOR NEXT