Sakal
पुणे

पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

सातत्याने वाहतूक कोंडी होत असलेला चौक, अशी ओळख निर्माण झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकातील वाहतुकीची स्थिती आता पूर्णपणे बदलली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सातत्याने वाहतूक कोंडी (Traffic) होत असलेला चौक, अशी ओळख निर्माण झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकातील (Pune University Chowk) वाहतुकीची स्थिती आता पूर्णपणे बदलली आहे. येथील वाहतूक बदलामुळे (Traffic Changes) कोंडीवर नियंत्रण आले आहे. तसेच चौकामध्ये केलेल्या वर्तुळाकार वाहतूक बदलामुळे आता वाहतूक जलद झाली आहे. बदलाची माहिती झाल्याने आता वाहनचालकांचा होणार गोंधळ देखील कमी झाला आहे.

विद्यापीठासमोरील चौकात बांधण्यात येणाऱ्या दुमजली उड्डाणपुलाच्या कामामुळे परिसरातील वाहतूक २३ डिसेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर वर्तुळाकार पद्धतीने वळवली आहे. विद्यापीठासमोरील चौक, बाणेर रस्ता, पाषाण रस्ता, गणेशखिंड रस्ता व इतर प्रभावित रस्त्यावरील वाहतुकीमध्ये बदल केला. त्यामुळे औंध व बाणेर-पाषाणहून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या आणि शिवाजीनगरहून औंध, बाणेर-पाषाणकडे जाणाऱ्या वाहतुकीस गती मिळाली आहे. परंतु, ई-स्क्वेअरसमोर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे हा रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे पाषाण, बाणेर-बालेवाडी व औंध या तिन्ही रस्त्यांवरून शिवाजीनगरच्या दिशेने जाणारी वाहने काही प्रमाणात कॉसमॉस बॅंकेपासून ते खैरेवाडीपर्यंतच्या कोंडीत अडकत आहेत. त्यामुळे विद्यापीठ चौकातून सुटले, तरीही वाहनचालक पुढच्या कोंडीच्या जाळ्यात अडकत असल्याची स्थिती आहे.

नागरिकांच्या सूचनांची अंमलबजावणी

वर्तुळाकार वाहतूक सुरू केल्यानंतर येथील स्थानिक नागरिकांनी काही सूचना सुचविल्या होत्या. त्यातील अनेक सूचना व नागरिकांच्या समस्या सोडविण्यात आल्या आहेत. मार्गाच्या बदलामुळे वाहनचालकांचा होणार गोंधळ देखील कमी झाला आहे. कारण त्यांना मार्ग आता चांगल्या पद्धतीने समजला आहे. चौकात रात्रीच्या वेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर देखील योग्य ती कारवार्इ करण्यात येत आहे, अशी माहिती चतुःशृंगी वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम देवकर यांनी दिली.

शाळा कॉलेज सुरू नसल्याने तसेच अनेक कार्यालयांतील कर्मचारी वर्क फॉर्म होम करीत असल्याने रस्त्यांवरील गर्दी कमी आहे. तसेच विद्यापीठ चौकामध्ये केलेल्या वर्तुळाकार वाहतूक बदलामुळे येथील कोंडी कमी झाली आहे. चौकातून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सध्या काही ठिकाणी कोंडी होत आहे. ती सोडविण्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत.

- पुरुषोत्तम देवकर, सहायक पोलिस निरीक्षक, चतुःशृंगी वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: ..म्हणून ऑपरेशन टायगर अपयशी? भाजपच्या शब्दावर खासदारांची मदार, दोघांच्या सह्याच नाहीत

BMC jobs: मुंबई महापालिकेकडून मोठी भरती जाहीर! २० ते ३० हजार पगार अन्... राजावाडी रुग्णालयात विविध पदांसाठी संधी, अर्ज कसा करायचा?

Latest Marathi News Live Update: पुण्यातील कचऱ्यासंदर्भात राज्यमंत्र्यांचे आदेश

T20I World Cup, IND vs NED: स्मृती मानधनाचा अर्धशतकासह मोठा विक्रम, शफाली वर्माचीही वादळी फिफ्टी; भारताच्या २०० धावा पार

Nasrapur Crime Case : नसरापूर प्रकरणात सरकार पक्षाने १६ दिवसांत सादर केले पुरावे; ५५ साक्षीदारांची नोंदवली साक्ष

SCROLL FOR NEXT