Pune-District-Court sakaal
पुणे

न्यायालयीन कामकाज पुन्हा मंदावले

पुणे जिल्हा न्यायालयातील सुनावणीचे कामकाज दोन शिफ्टमध्ये सुरू

सकाळ वृत्तसेवा

पुणे: शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कामाची वेळ कमी केल्याने न्यायालयीन कामकाज पुन्हा मंदावले आहे. ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थित महत्त्वाच्या प्रकरणांवरच सुनावणी घेण्याच्या निर्णयामुळे कोरोनाकाळात अन्य दाव्यांना पुढील तारखा दिल्या जात आहेत.पुणे(PUNE)जिल्हा न्यायालयातील(Pune-District-Court) सुनावणीचे कामकाज दोन शिफ्टमध्ये सुरू करण्यात आले आहे. कामाची वेळ एका तासाने कमी करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार आता सुनावणीचे कामकाज सकाळी ११ ते दुपारी दोन आणि दुपारी दोन ते चार अशा दोन शिफ्टमध्ये सुरू आहे.

या पूर्वी सकाळी ११ ते पाच अशी सुनावणी होत होती. दोन शिफ्टमध्ये साक्ष नोंदविणे, युक्तिवाद ऐकणे, केवळ तडजोडीसाठी हजर राहणे असे कामकाज होत आहे. परिणामी, प्रलंबित दाव्यांच्या संख्येत भर पडत गेली. नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडच्या आकडेवारीनुसार, पुणे जिल्हा न्यायालयात सध्या सहा लाख सात हजार ४१४ दावे प्रलंबित आहेत. यामध्ये दिवाणी दाव्यांमध्ये सिव्हिल सूट, मॅरेज पिटिशन, एमएसीपी, लॅण्ड रेफरन्स, एआयसी सिव्हिल, इलेक्शन पिटिशन, कमर्शिअल सूट, अर्बिट्रेशन मेन अ‍ॅण्ड एमआयएससी यांच्याशी संबंधित दाव्यांचा समावेश आहे.

तर, फौजदारीमध्ये वॉरंट ऑर समन्स क्रिमिनल, सेशन व जुवेनाईल या प्रकारच्या दाव्यांचा समावेश आहे.कोरोनामुळे न्यायालयातील कामकाजाची गती मंदावली आहे. पक्षकारांचे नुकसान टाळण्यासाठी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दाव्यांवर सुनावणी घेणे आवश्यक आहे. मात्र कोरोना येऊन दोन वर्षे झाली तरी त्याअनुषंगाने आपल्याकडे यंत्रणा कार्यान्वित होताना दिसत नाही. याबाबत प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

- ॲड. सतीश थोरात, वकील, जिल्हा न्यायालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT