पुणे

प्रभाग रचनेवर आठवड्याभरात ४० हरकती

CD

पुणे, ता. ७ : महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांकडून गेल्या सात दिवसांत केवळ ४० हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. यासाठी १४ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे.

निवडणूक आयोगाने गेल्या १ फेब्रुवारी रोजी प्रारूप विकास आराखडा जाहीर केला. या वेळी तीन सदस्यांचा प्रभाग असल्याने २०१७च्या तुलनेत ही प्रभाग रचना पूर्णपणे वेगळी आहे. काही प्रभाग दोन, तीन आणि चार भागात विभागले आहेत. सोसायट्या, वस्त्यांचीही विभागणी झाली आहे. प्रभाग रचनेबाबत नगरसेवकांमध्ये देखील नाराजी असून, हक्काचा मतदार दुसऱ्या प्रभागात गेल्याने त्यांची चिंता वाढली आहे.
भाजपने या प्रभाग रचने विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, अद्याप ही याचिका दाखल झाली नाही. महापालिकेच्या निवडणूक शाखेकडे सोमवारी दोन हरकती व सूचना आल्या. तसेच १ ते ७ फेब्रुवारी दरम्यान ४० हरकती व सूचना आलेल्या प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

निवडणूक शाखेने जाहीर केलेल्या अधिसूचना व नकाशा एक सारखे नाही. जो भाग नकाशात आहे, तो अधिसूचनेत नाही व जो अधिसूचनेत नाही तो नकाशात आहे, असे प्रकार घडल्याने नागरिक व स्थानिक नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रभाग रचनेचा अभ्यास अद्यापही सुरू असून, उर्वरित दिवसांत हरकती व सूचना येण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress: या मतदारसंघात काँग्रेस करतंय चक्क 'नोटा'चा प्रचार, काय आहे कारण?

Look Younger: मेकअप आणि सर्जरी न करता त्वचेला तरुण ठेवण्यासाठीचे ५ सोपे मार्ग

Devendra Fadnavis: ...त्यामुळं मोदींनी पवार-ठाकरेंना कुठलीही ऑफर दिलेली नाही; फडणवीसांचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update: केजरीवालांनंतर सोरेन यांना दिलासा मिळणार का? १३ मे रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी

Mahavitaran : महावितरणकडे आता चॅट बॉटद्वारे तक्रार नोंदवता येणार

SCROLL FOR NEXT