पुणे

कर्नाटकात वीकेंड कर्फ्यू जारी

CD

बंगळूर, ता. ४ : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यात वीकेंड कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बंगळूरमधील सर्व शाळा दोन आठवड्यांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी तज्ज्ञांसोबत झालेल्या बैठकीनंतर मंत्री अशोक आणि सुधाकर यांनी माहिती दिली. शुक्रवार संध्याकाळपासून सोमवारी पहाटे पाच वाजेपर्यंत वीकेंड कर्फ्यू असेल.
संपूर्ण कर्नाटकात दोन आठवड्यांचा वीकेंड कर्फ्यू लागू होईल. फक्त बंगळूरमध्ये दोन आठवड्यांसाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावी आणि बारावी वगळता, पहिला ते नववी आणि अकरावीपर्यंतच्या इतर सर्व वर्गांना उद्यापासून (बुधवारी) दोन आठवडे सुटी देण्यात आली आहे. बंगळूरमध्ये, दहावी आणि बारावी इयत्ता वगळता, बाकी सर्व ऑफलाइन वर्ग बंद राहातील. शाळा, महाविद्यालयांचे वर्ग ऑनलाइन सुरू राहातील. वीकेंड कर्फ्यू ६ तारखेपासून लागू होईल. शुक्रवारी सकाळी १० ते सोमवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वीकेंड कर्फ्यू असेल. आहार पदार्थ, हॉटेलमध्ये पार्सल व आवश्यक सेवा सुरू राहणार आहेत, असे बैठकीनंतर मंत्री अशोक व डॉ. के. सुधाकर यांनी स्पष्ट केले.

कर्नाटकातील नियमावली
* सरकारी कार्यालये, मॉल भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतील
* थिएटर्स, मॉल्स, बार आणि पबच्या एकूण क्षमतेपैकी फक्त ५० टक्के लोकांसाठी खुली
* मंदिरात फक्त ५० टक्के लोकांना प्रवेश असेल
* सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी दोन्ही डोस घेतलेले बंधनकारक
* विवाहासाठी २०० लोकांना व बंदिस्त कार्यालयात १०० लोकांना परवानगी
* महाराष्ट्र आणि केरळमधून येणाऱ्यांसाठी आरटीपीसीआर अनिवार्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Latest Marathi News Live Update : खरात प्रकरणी सर्व गुन्हे एसआयटीकडे वर्ग

बापरे! भारतात दिसला झोम्बी? पंजाबमध्ये या ठिकाणी नक्की घडतंय तरी काय? Viral Video

SCROLL FOR NEXT