पुणे

हजूरपागा प्रशालेत ‘अध्ययन समस्या समजून घेताना...’ शिबिराचे आयोजन

CD

हुजूरपागा प्रशालेत
शिबिराचे आयोजन

पुणे, ता. ९ : ‘‘शाळेमध्ये काही विद्यार्थी शांत असतात, काही अस्थिर असतात, काहींच्या बोलण्यांमध्ये चमक जाणवते. प्रत्येक मूल ओळखण्यासाठी ते अनेक अनुभवामधून वाचायला शिकले पाहिजे. काही विद्यार्थ्यांना काही विषयांमध्ये अध्ययनात अडचणी येताना दिसतात. त्या कारणांचा शोध घेण्याच्या प्रक्रियेत मुलांचे चेहरे वाचून त्यांच्या मनातील ओळखण्याचा प्रयत्न शिक्षकांनी करायला हवा,’’ असा सल्ला तज्ञांनी शिक्षकांना दिला.

महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी हुजूरपागा विद्या विकास व्यासपीठातर्फे ‘अध्ययन समस्या समजून घेताना...’ विषयावर डॉ. शांता वैद्य मेमोरिअल फाउंडेशनच्या उमा पळसुले यांनी तीन दिवसीय शिबिर घेतले. यावेळी संस्थेच्या मुख्य विश्वस्त जयश्री बापट, अध्यक्षा रेखा पळशीकर, हिमानी गोखले, शालिनी पाटील, विनया देशपांडे, डॉ. सुषमा केसकर, वर्षा गजेंद्रगडकर, डॉ. अरुणा भांबरे, अरुणा तिवारी आदी उपस्थित होते.

पळसुले म्हणाल्या, ‘‘प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. शिक्षकांना विद्यार्थ्यांची निरीक्षणे करून त्यांच्या मनातील भाव टिपणे ही गोष्ट जमली पाहिजे. विविध नावीन्यपूर्ण खेळातून विद्यार्थ्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न शिक्षकांनी करायला हवा.’’ अध्ययन करताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आपण कशा शोधायला हव्या, याकरिता आयोजित शिबिरात वेगळा दृष्टिकोन समोर आल्याचे पळशीकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी आज राम मंदिरात जाऊन घेणार रामलल्लाचे दर्शन

SCROLL FOR NEXT