पुणे

सृष्टी संस्थेच्या ‘चावडी’चे उदघाटन

CD

पुणे, ता. १३ : ‘‘विद्यार्थ्यांना शाळेमध्ये यावेसे वाटेल, असे वातावरण तयार करण्याची जबाबदारी ही शिक्षण व्यवस्थेची आहे. शिक्षणाबाबत आगामी काळातील निर्णय घेताना, धोरण ठरविताना सर्व पातळीतील विद्यार्थ्यांचा विचार करण्याची गरज आहे. तसेच कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना विद्यार्थ्यांवर शिक्षणाचे जीवनदर्शी संस्कार केल्यास त्याचे चांगले परिणाम मिळू शकतात,’’ असे मत बाल शिक्षण मंचाचे संस्थापक अध्यक्ष अमर पोळ यांनी व्यक्त केले.

विविध क्षेत्रातील संवेदनशील व्यक्तींच्या कार्याची समाजाला ओळख करून देण्यासाठी सृष्टी संस्थेच्या वतीने ‘चावडी’ हे नवे व्यासपीठ सुरू केले आहे. या व्यासपीठाच्या उद्‌घाटनानिमित्त अमर पोळ यांच्याशी संवाद साधण्यात आला. या वेळी शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे संस्थापक प्रशांत कोठडिया यांनी पोळ यांच्याशी संवाद साधला. या वेळी पोळ यांनी ‘विद्यार्थी ते शिक्षक’ असा प्रवास उलगडला. गुंजाळ यांनी शिक्षण व्यवस्थेसमोरील आव्हाने आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकता या विषयावर भाष्य केले. ते म्हणाले,‘‘विद्यार्थ्यांची मानसिकता आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा सर्वांनी सक्रिय प्रयत्न करणे गरजेचे आहे.’’ प्रास्ताविक सचिन नाईक यांनी केले. संस्थेचे सरचिटणीस शेखर केंदळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

'ठरलं तर मग' मालिका अर्जुन सुभेदार सोडणार? अमित भानुशाली पात्राबद्दल बोलताना म्हणाला, 'आता वेळ आलीय, मी आयुष्यभर...'

Weekly Horoscope September 2026 : सप्टेंबर १४ ते २० दरम्यान ‘या’ ५ राशींसाठी लॉटरी; नशिबाची जोरदार साथ मिळणार

Marathi News Live Updates : तिसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडीचा फटका; माणगाव-इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

Amravati Jail news : आठवड्याभरात तिसऱ्या बंदीचा मृत्यू ;जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील घटनेमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT