पुणे

यशवंत ब्रिगेडद्वारे मंगळवारी मंत्रालयासमोर महामोर्चा

CD

पुणे, ता. १५ धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. परंतु महाविकास आघाडी सरकारचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. आरक्षण नसल्याने धनगर समाजाचा शैक्षणिक, आर्थिक, राजकीय विकास खुंटला आहे. त्यामुळे धनगर समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. प्रशासनाने या समाजाच्या प्रश्‍नांना सोडविण्यासाठी त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात. यासाठी यशवंत ब्रिगेड संघटना व इतर संघटनांच्या माध्यमातून मंगळवारी (ता. २२) मुंबई येथील मंत्रालयासमोर धनगर समाजाचा महामोर्चा काढणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष बापूराव सोलनकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी गणपत देवकाते, चंद्रकांत वाघमोडे, वसंत घुले, सोमनाथ देवकाते आदी उपस्थित होते. सोलनकर म्हणाले, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण दिलेले आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी झाली नाही. राज्यातील धनगर समाजाची लोकसंख्या दोन कोटींच्या वर आहे, हे राज्य सरकारला माहिती नसावे. त्याचीच जाणीव करून देण्यासाठी हा महामोर्चा काढणार आहे. तसेच २८ फेब्रुवारी रोजी बारामती येथे सकाळी अकरा वाजता धरणे आंदोलन ही करण्यात येईल. त्यामुळे सरकारने विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात धनगर समाजाच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा.’’

प्रमुख मागण्या ः
- अहिल्यादेवी शेळी-मेंढी आर्थिक विकास महामंडळासाठी एक हजार कोटींची तरतूद करावी
- धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी करावी
- नवउद्योजकांना विनातारण दहा लाख कर्ज पुरवठा करावा
- ओबीसी आरक्षण पुर्ववत होण्यासाठी तीन महिन्यांच्या आत इंपेरीकल डाटा तयार करावा
- शेळी-मेंढी यांच्यावर उपचार व लसीकरण करण्यासाठी सुसज्ज मोबाईल हॉस्पिटल असावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: ‘आमदारगिरी’चा बनाव तरुणाच्या अंगाशी! पुण्यात ऑडीवर लावलं 'आमदार' स्टिकर, मद्यधुंद अवस्थेत कार पळवणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला घेतलं ताब्यात

Nandigram Express : नंदिग्राम एक्स्प्रेस चुकीच्या रुळावर लोको पायलटच्या सतर्कतेने अनर्थ टळला, किनवट स्थानकावर दोन तास खोळंबा

Latest Marathi News Update : मराठा समाजाला न्याय द्या, पण ओबीसींचे वाटोळे सरकारने केले विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

Japan's Population: ११४ वर्षांच्या आजी अन् ११२ वर्षांचे आजोबा! काय आहे जपानमधील नागरिकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य?

MPSC Success Story: एक एकर शेती, आई-वडिलांची मजुरी अन् पूजाची जिद्द; चौथ्या प्रयत्नात MPSC परीक्षेत महसूल सहाय्यकपदी यश, जिद्दीची यशोगाथा

SCROLL FOR NEXT