पुणे, ता. १७ ः पीएमपीएमएलने निगडी ते आळंदी (मार्ग क्रमांक ३४०) हा नवीन बसमार्ग गुरुवारी सुरू केला. तसेच आळंदी ते बहुळ (मार्ग क्रमांक २६४) या बसमार्गाचा विस्तार भोसरी ते पाबळगाव असा तर भोसरी संतनगर ते पुणे मनपा भवन (मार्ग क्रमांक ३३९) या बसमार्गाचा विस्तार भोसरी संतनगर ते कात्रज असा करण्यात आला आहे.
भोसरी येथे संतनगर चौकात आमदार महेश लांडगे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या हस्ते या बस सेवांचे लोकार्पण केले. योगेश लांडगे, शिवराज लांडगे यांनी या बस सेवेसाठी पाठपुरावा केला होता. निगडी ते आळंदी या बससेवेचा मार्ग निगडी, यमुनानगर, थरमॅक्स चौक, चऱ्होली फाटा, काटे वस्ती, देहू रोड, आळंदी असा असणार आहे. सध्या या मार्गावर २ बसेसद्वारे दर एक तासाने दिवसभरात एकूण २८ फेऱ्या होणार आहेत. निगडी ते आळंदी पहिली बस सकाळी ६.१० वाजता तर शेवटची बस रात्री ८.५० वाजता आहे. तसेच आळंदी ते निगडी पहिली बस सकाळी ६.५५ वाजता तर शेवटची बस रात्री १० वाजता आहे.
भोसरी ते पाबळ गाव या बससेवेचा मार्ग भोसरी, मॅगझीन चौक, चऱ्होली फाटा थिटेवाडी, पाबळ गाव असा असणार आहे. सध्या या मार्गावर २ बसेसद्वारे दर दीड तासाने दिवसभरात एकूण १४ फेऱ्या होणार आहेत. भोसरी ते पाबळ गाव पहिली बस सकाळी ६ वाजता तर शेवटची बस रात्री ७.४५ वाजता आहे. तसेच पाबळगाव ते भोसरी पहिली बस सकाळी ६.४० वाजता तर शेवटची बस रात्री ८.३० वाजता आहे. भोसरी संतनगर ते कात्रज या बस सेवेचा मार्ग भोसरी, नाशिक फाटा, टिळक रोड, स्वारगेट, कात्रज गुजरवाडी फाटा असा असणार आहे. सध्या या मार्गावर २ बसेद्वारे दर पावणेदोन तासाने दिवसभरात एकूण १९ फेऱ्या होणार आहेत. भोसरी संतनगर ते कात्रज पहिली बस सकाळी ५.४५ वाजता तर शेवटची बस रात्री ८.०० वाजता आहे. तसेच कात्रज ते भोसरी संतनगर पहिली बस सकाळी ७.३० वाजता तर शेवटची बस रात्री ८ वाजता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.