पुणे

महापालिका सेवकांना घरभाड्यात दिलासा

CD

पुणे, ता. ४ : महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून पालिकेच्या वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या सदनिकांची भाडेवाढ न करण्याचा निर्णय स्थायी समितीने आज (मंगळवारी) घेतला, अशी माहिती स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा घरभाड्याची कपात करण्यात येते. सातवा वेतन आयोग लागू होताना घराचे भाडे जास्त वाढले आहे, तसेच महापालिकेच्या सदनिकांची दुरवस्था झाल्याने प्रस्तावित वाढ अन्यायकारक ठरणार असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली होती. भाजपचे माजी सभागृहनेते धिरज घाटे यांनी महापालिकेच्या इमारतींमध्ये भाडेपट्ट्याने राहणाऱ्या सर्व सेवकांची सहाव्या वेतन आयोगाप्रमाणेच घरभाड्याची आकारणी करावी असा प्रस्ताव दिला होत. त्यास आज स्थायी समितीने मान्यता दिली.

धिरज घाटे म्हणाले,‘‘कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू झाला तरी महापालिकेची घरे जुनी झाली आहेत. घरे गळत असून त्यांना स्वच्छतागृह स्वतंत्र नाहीत. अनेक ठिकाणच्या वसाहती मोडकळीस आलेल्या आहेत. अशी दुरवस्था झालेली असताना १० हजार ते १२ हजार भाडे महापालिकेच्याच कर्मचाऱ्यांकडून घेणे योग्य नाही. त्यामुळे सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे भाडे आकारावे असा प्रस्ताव दिला होता. त्यास मान्यता दिल्याने ९ हजार कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

बस चार्जिंग स्टेशनसाठी सव्वाकोटी

बाणेर येथील पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बस चार्जिंग स्टेशनमध्ये सुमारे एक कोटी पंचवीस लाख रुपयांची विद्युतविषयक विकासकामे करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. या कामासाठी आठ निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी सर्वात कमी दर असणाऱ्या निविदेला मान्यता देण्यात आली.

बाळासाहेब ठाकरे नाट्यगृहासाठी निधी

कोथरूड येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नाट्यगृहात विविध विद्युत विषयक कामे करण्यासाठी ७५ लाख ८५ हजार रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली. इन डोअर फिटिंग, पंखे, वॉटर कुलर, पॉइंट वायरिंग, केबल टाकून विद्युत व्यवस्था, पी ए सिस्टिम बसविणे आदी कामे केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT