पुणे

जिम, ब्युटीपार्लरला सशर्त परवानगी

CD

पुणे, ता. ९ ः कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंधांची घोषणा शनिवारी (ता. ८) सायंकाळी राज्य सरकारने केली. यात जिम आणि ब्युटीसलून पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र राज्यभरातील जिम आणि सलूनमालक-चालकांनी याविरुद्ध तीव्र असंतोष व्यक्त केला होता. याचीच दखल घेत चोवीस तासांच्या आत राज्य सरकारने जिम आणि ब्युटीसलून ५० टक्के उपस्थितीत चालविण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे जिम आणि सलूनचालकांना जीव भांड्यात पडला आहे.
नव्या निर्णयामुळे आता लशीचे दोन्ही डोस घेतलेले कामगार सलून आणि जिममध्ये काम करू शकतात. ५० टक्के उपस्थितीत दिलेल्या नियमांनुसार जिम आणि सलून खुली राहणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर खात्यावर रविवारी संध्याकाळी यासंबंधीची माहिती देण्यात आली. ‘‘मागील दोन वर्षांपासून या दोन्ही व्यवसायांना मोठा आर्थिक फटका बसला होता. या दोन वर्षांत अनेक चालकांनी जिम व्यवसायही बंद केला. उत्पन्न थांबल्याने महिन्याचे भाडे, वीज बिल, उपकरणांची देखभाल, आदी खर्च भागविणे कठीण झाले होते. त्यात गेल्या वर्षी केवळ सहा ते सात महिने जिम सुरू होती, त्यातून हळूहळू उत्पन्नाला चालना मिळत होती. जिम बंद करण्याच्या निर्णयामुळे पुन्हा या समस्या उद्भवणार होत्या. राज्य सरकारने वेळीच हा निर्णय मागे घेत ५० टक्के क्षमतेने व्यवसाय करण्यास परवानगी दिल्याने मोठा दिलासा मिळाला आहे’’, असे मत जिमचालक सागर गोदमगावे यांनी व्यक्त केले.

असे निर्बंध...
- कामगारांचे लशीचे दोन्ही डोस आवश्यक
- मास्क काढण्याची गरज नसलेल्या सेवांना परवानगी
- लशीचे दोन डोस घेतलेल्या ग्राहकांना प्रवेश
- कोरोनासंबंधीच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेळेच्या नियमांचे पालन आवश्यक


शहरात सुमारे तीन हजार जिम आहेत. आधीचे लॉकडाउन व सततच्या निर्बंधांमुळे जिम व्यवसायाची वाताहत झाली आहे. शरीराची सुदृढता यावर शरीराची कार्यक्षमता अवलंबून असते, याचाच फायदा कोरोनाशी लढण्यात सर्वसामान्यांना होणार असून आरोग्य हीच धनसंपदा आहे, लसीकरण होऊनसुद्धा जिम पूर्णपणे बंद ठेवणे हा जिम व्यवसायावर अन्याय होणार होता. मात्र इतर गोष्टींप्रमाणे जिमदेखील ५० टक्क्यांच्या क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे, याचे आम्ही स्वागत करतो.
- नीलेश काळे, अध्यक्ष, पुणे फिटनेस क्लब असोसिएशन

गेल्या अनेक वर्षांपासून जिमला जात आहे. दीड वर्षापासून वर्क फ्रॉम होममुळे घरी राहून शारीरिक आणि मानसिक ताण वाढत आहे. त्यात व्यायाम हा शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून जिमसंबंधी राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेत आम्हालाही एक प्रकारे दिलासा दिला आहे. सर्व खबरदारी घेऊन नागरिक जिममध्ये जातील.
- अभिजित घाटे, आयटी कर्मचारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 : इशा सिंग अन् चीनच्या शाओनेचे समान ३८ गुण, तरीही भारतीय नेमबाजाला मिळाले रौप्यपदक; असं का?

Vinod Kambli Viral Video: विनोद कांबळी वृद्धाश्रमात असल्याचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं? पत्नी अँड्रियाने केला मोठा खुलासा

Maharashtra Drought Relief : मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Mumbai Malaria: मुंबईत मलेरियाचा वाढता धोका! रुग्णसंख्या ९ हजारांवर; वर्षभरात ४१ टक्क्यांनी वाढ

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आज ‘मामा गोल्ड रिंग योजना’ सुरू करणार

SCROLL FOR NEXT