पुणे

मोझे प्रशालेत मराठी भाषा दिन साजरा

CD

पुणे, ता. २८ ः येरवडा येथील गेनबा सोपानराव मोझे प्राथमिक प्रशालेत मराठी भाषा गौरवदिनानिमित्त विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. याप्रसंगी ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कवी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांना अभिवादन करण्यासाठी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. लेझीम पथकाच्या माध्यमातून वाजत गाजत ग्रंथदिंडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ मोझे यांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे पूजन केले. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेलाही पुष्पहार अर्पण करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन राजू मंच आणि मीना मंचमधील विद्यार्थ्यांनी बालसभेच्या माध्यमातून केले होते. यावेळी शाळेतील शिक्षिका स्वाती मोरे, मीना नाळे आणि अनिता शिरसाट यांनी कुसुमाग्रजांच्या कविता सादर केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrivardhan Fishermen Crisis : खराब हवामानाचा मच्छीमारांना फटका श्रीवर्धन तालुक्यातील वल्हावरच्या लहान होड्या अद्यापही किनाऱ्यावर

माझ्यासाठी सुंदर दिसणं महत्वाचं नाही... प्रेग्नन्सीनंतर वजनावरून ट्रोल करणाऱ्यांना कतरीना कैफचं सडेतोड उत्तर

Sanjay Gaikwad Reaction : शेतकरी संकटात अन् मंत्री फुलांवरून चालले; संजय गायकवाडांचा शिरसाटांना घरचा आहेर

Marathi News Live Updates : बदलापुरात बसची दुचाकीला धडक दुचाकीवरील तरुणीचा मृत्यू, तरुण गंभीर जखमी

Sangli Water Restriction:धरणे तुडुंब भरलेली असताना उपसाबंदी कशासाठी? राजू शेट्टींचा शासनावर हल्लाबोल : सांगली-कोल्हापुरात पहिल्यांदाच निर्णय

SCROLL FOR NEXT