पुणे

नवोदित उद्योजकांसाठी ‘डॉ. प्र. चिं. शेजवलकर उद्योजकता संशोधन केंद्र’ सुरु

CD

पुणे, ता. १ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) वतीने नवोदित उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘डॉ. प्र. चिं. शेजवलकर उद्योजकता संशोधन केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्‌घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते शनिवारी (ता. ५) सायंकाळी पाच वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये करण्यात येणार आहे, अशी माहिती सोसायटीचे उपाध्यक्ष महेश आठवले यांनी दिली.
‘‘नावीन्यपूर्ण कल्पनांचे व्यवसायात रूपांतर करण्यासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन या केंद्राद्वारे दिले जाणार आहे. नवोदित उद्योजकांच्या विचार प्रक्रियेला आकार देणे, व्यवसायाची योजना तयार करणे, कौशल्य विकसित करणे, बाजारपेठेचे सर्वेक्षण, वित्तपुरवठा योजनांची माहिती, विविध परवाने मिळविणे, अशा उद्योजकाला आवश्यक असणारे गुण विकसित करण्यासाठी या केंद्रावर मार्गदर्शन मिळणार आहे. केंद्रासाठी आवश्यक मूलभूत सुविधा, संगणक कक्ष, प्रयोगशाळा आदी उपलब्ध करून देणार असून, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणार आहे. उद्योग उभा करण्यासाठी या केंद्रामार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाणार आहे,’’ असे आठवले यांनी सांगितले. व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांच्या स्मरणार्थ हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्राच्या उद्‌घाटनाप्रसंगी स्पेल टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष राजेंद्र शर्मा, ल्युपिन रिसर्च पार्कचे वरिष्ठ उपाध्यक्ष गिरीज पाल सिंग, डॉ. सुषमा केसकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. केंद्राची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत सोसायटीचे कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, संचालक मिलिंद कांबळे, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंग परदेशी, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट ॲण्ड रिसर्चच्या (आयएमडीआर) संचालिका डॉ. शिखा जैन आदी उपस्थित होते.

‘डॉ. प्र. चिं. शेजवलकर उद्योजकता संशोधन केंद्रा’चे असे असेल वैशिष्ट्ये :
- नवीन कल्पनांचे व्यवसायात रूपांतर करण्यासाठी मिळणार मार्गदर्शन
- नवोदित उद्योजकांना केंद्रामार्फत मूलभूत सुविधा, संगणक कक्ष, प्रयोगशाळा उपलब्ध होणार
- उद्योगाला अर्थसाहाय्य मिळवून देण्यासाठी गुंतवणूकदार शोधण्यास मिळणार मदत
- तज्ज्ञाकडून मिळणार धडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT