पुणे

मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा

CD

पुणे, ता. १ ः ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक हे आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमचा गुलाम असल्याचे ईडीच्या आरोपपत्रातून स्पष्ट होत आहे. तरीही त्यांचा राजीनामा न घेता नवाब यांची सरबराई करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. सत्तेच्या सुरक्षेसाठी जनतेच्या सुरक्षेला मूठमाती दिली जात आहे. हे प्रकार ताबडतोब सरकारने थांबवून मलिक यांची मंत्रिमंडळ हकालपट्टी करा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

भाजपच्या शहर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रवीण दरेकर बोलत होते. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार बापू पठारे आदी यावेळी उपस्थित होते.
प्रवीण दरेकर म्हणाले, ‘‘नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर ते साधूसंत असल्यासारखे वातावरण राज्यातील सत्ताधारी करत आहेत. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकार सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप करत आहेत, पण एकाही प्रकरणात भाजपचा हात नाही.’’

नवाब मलिक यांचे कारनामे जनतेला कळावेत यासाठी आम्ही राज्यभर पत्रकार परिषद आहोत, पण त्यांना ईडीने अटक केली. यात भाजप व केंद्राचा संबंध कुठेही संबंध नाही. नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मलिक यांचा राजीनामा घेतला पाहिजे, पण सत्ता जाईल या भीतीने ठाकरे हतबल आहेत, अशी टीका दरेकर यांनी केली.

राज्यपाल कोश्‍यारी जे बोलले याचा विपर्यास केला जात आहे. त्यांना शिवाजी महाराज यांच्याबद्दल आदर आहे, अनादर केलेला नाही, असे दरेकर यांनी सांगितले.
--------------------
भूमिकेवरून दरेकरांचा गोंधळ
‘नवाब मलिक हे देशद्रोही आहेत’ असे वक्तव्य दरेकर यांनी केले, पण तुम्ही त्यांना देशद्रोही कसे ठरवले असे त्यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आले. त्यावर ‘मलिक देशद्रोही नाहीत, पण ज्यांच्याकडून त्यांनी जमीन घेतली ते देशद्रोही आहेत’ असा खुलासा केला, पण दरेकरांच्या लेखी निवदेनात मलिक यांचा ‘देशद्रोही’ असा उल्लेख असल्याचे समोर आले. त्यावरून पुन्हा प्रश्‍न विचारताच ‘माझी चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद, मलिक देशद्रोहीच आहेत’ असे सांगत सारवासारव केली, पण पाच मिनिटांत दोन वेळा भूमिका बदलण्याची नामुष्की दरेकरांवर आली.
------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT