family sakal
पुणे

आई-वडिलांच्या कोरोनामुळे पुन्हा जुळला मुलाचा संसार

कोरोना काळात कौटुंबिक वाद वाढल्याचे अनेक प्रकरणे आपण ऐकली. मात्र, याच काळात दुरावलेली माणसे पुन्हा जवळ येत अनेकांचे संसार पुन्हा सुरू झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

कोरोना काळात कौटुंबिक वाद वाढल्याचे अनेक प्रकरणे आपण ऐकली. मात्र, याच काळात दुरावलेली माणसे पुन्हा जवळ येत अनेकांचे संसार पुन्हा सुरू झाले आहेत.

पुणे - कोरोना (Corona) काळात कौटुंबिक वाद (Family Dispute) वाढल्याचे अनेक प्रकरणे आपण ऐकली. मात्र, याच काळात दुरावलेली माणसे पुन्हा जवळ येत अनेकांचे संसार (Family) पुन्हा सुरू झाले आहेत. असाच काहीसा सुखद अनुभव शहरातील एका रुग्णालयात काम करीत असलेल्या एका नर्सला (Nurse) आला आहे. यातून ‘होते ते बऱ्यासाठीच’ या म्हणीचा पुन्हा एकदा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

सुप्रिया या शहरातील एका नामांकित रुग्णालयात नर्स आहे, तर त्यांचे पती सुरेश (दोघांचीही नावे बदललेली) यांचा व्यवसाय आहे. त्यांना दोन मुली आहेत. मात्र, दोघांमध्ये गेल्या पाच वर्षांपासून मतभेद झाल्याने ते विभक्त राहत होते. तसेच दोन्ही मुली सुप्रिया यांच्याबरोबर राहत होत्या. आता आपण संसार पुन्हा जुळेल की नाही, अशी शंका असल्याने पती, पत्नीने स्वतंत्र घर देखील घेतले होते. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुप्रिया यांच्या सासू-सासऱ्यांना कोरोना झाला. त्या काळात सुप्रिया यांनी त्यांच्या तब्यतेची चांगली काळजी घेतली. त्यातून सुप्रिया आणि सासरच्यांमध्ये असलेला वाद संपला आणि ते पुन्हा एकत्र आले. सुरेश यांनी कौटुंबिक न्यायालयात दाखल केलेला घटस्फोटाचा दावा देखील मागे घेतला आहे.

सासू-सासऱ्यांचे मत परिवर्तन

मुलगा आणि सुनेत झालेल्या वादाचा काही अंशी त्रास सुप्रिया यांच्या सासू-सासऱ्यांना देखील झाला होता. त्यामुळे सुनेला नांदवायचे नाही, या निष्कर्षापर्यंत ते पोचले होते. मात्र, सुनेने केलेल्या सेवेमुळे दोघांच्याही मनात असलेल्या रागाचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी सुनेला पुन्हा आपल्या कुटुंबात सहभागी करण्याचे मुलाला सांगितले.

आपण जर चांगले वागलो; तर समोरची व्यक्‍ती देखील आपल्याशी चांगलीच वागते हे, या दाव्यातून स्पष्ट झाले. त्यामुळे पाच वर्षांचा वाद अगदी काही दिवसांत संपला. कोरोनामुळे कौटुंबिक वाद काहीसे वाढले असले, तरी काही संसार देखील जुळले आहेत. कोणाला कोरोना होणे वार्इट आहे. मात्र त्यातून आपल्या माणसांची आपुलकी आणि प्रेम अनेकांनी अनुभवले. सुनेने माणुसकीचा धर्म जपला. त्यामुळे त्यांच्या मुलींना देखील वडील व आजी-आजोबांचे प्रेम मिळाले.

- सुनीता जंगम, सुरेश यांच्या वकील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे?

Bhandup Hospital MNS Protest : मुंबईत 19 वर्षीय तरुणीवर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याकडून जबरदस्ती, मनसेचा आरोप, कर्मचाऱ्याला मारहाण

Baramati by-election News: बारामती पोटनिवडणूक : कॉंग्रेसची अखेर माघार, आकाश मोरे यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतला

LPG Supply: होर्मुज मार्ग पुन्हा बंद! भारतात तेल टँकर येणार की नाही? केंद्र सरकारने प्लॅन B सांगितला, मोठी अपडेट समोर

Leopard enters house kitchen : बिबट्या थेट स्वयपाक घरात आला अन् पाहुणा झाला..., घायाळ बिबट्याला घरातून कसं काढलं बाहेर

SCROLL FOR NEXT