PDCC Bank sakal
पुणे

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची आज मतमोजणी

पुणे शहरातील लष्कर परिसरातील अल्पबचत भवनात ही मतमोजणी केली जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे शहरातील लष्कर परिसरातील अल्पबचत भवनात ही मतमोजणी केली जाणार आहे.

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (pune district central cooperative bank) संचालक मंडळाच्या २१ पैकी सात जागांची मतमोजणी येत्या मंगळवारी (ता.४) सकाळी नऊ वाजल्यापासून पुण्यात केली जाणार आहे. या सात जागांसाठी १४ उमेदवार आपापले नशीब अजमावत आहेत. पुणे शहरातील लष्कर परिसरातील अल्पबचत भवनात ही मतमोजणी केली जाणार आहे. उद्या दुपारी एक वाजेपर्यंत सर्व निकाल (pdcc bank result)हाती येतील, अशी शक्यता वर्तविली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार(ajit pawar), गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील(dilip walse patil), बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे हे तीन मंत्री, संग्राम थोपटे, संजय जगताप आणि दिलीप मोहिते-पाटील हे तीन आमदार आणि बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात आदींसह १४ जण आधीच बिनविरोध झाले आहेत. या सर्वांच्या निवडीची उद्या अधिकृत घोषणा होणार आहे.

जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या एकूण २१ जागा आहेत. यामध्ये प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी एक, याप्रमाणे १३ तालुकास्तरीय ‘अ’ वर्ग मतदारसंघ आहेत. या १३ पैकी १० जागा बिनविरोध झालेल्या आहेत. केवळ शिरूर, हवेली आणि मुळशी या तीन तालुक्यातील ‘अ’ वर्ग मतदारसंघासाठी मतदान झालेले आहे. याशिवाय ‘क’ आणि ‘ड’ या दोन मतदारसंघातील प्रत्येकी एक, याप्रमाणे दोन आणि महिला राखीव मतदारसंघातील दोन जागा अशा एकूण सात जागांसाठीची मतमोजणी केली जाणार आहे.

जिल्हा बॅंकेसाठी दौंड तालुक्यात एकूण २७८ मतदार आहेत. यापैकी काही मयत झालेले आहेत. त्यामुळे उर्वरित सर्वच्या सर्व २६२ मतदारांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे. दौंड हा १०० टक्के मतदान झालेला जिल्ह्यातील एकमेव तालुका असल्याचे या बॅंकेचे अध्यक्ष आणि दौंड तालुक्यातून सलग आठव्यांदा बॅंकेवर निवडून आलेले ज्येष्ठ संचालक रमेश थोरात यांनी सोमवारी (ता.३) सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs MI Live: मुंबई इंडियन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड! चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ढेपाळले, पण जगात चमकले; भारतीय संघालाही हे नाही जमले...

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

CSK vs MI Live: पुण्याच्या पोराने कमाल केली! आधी अफलातून झेल टिपला, नंतर सूर्यकुमार यादवची विकेट घेत दिला तगडा झटका Video

SCROLL FOR NEXT