पुणे

नॅशनल युथ पार्लमेंटतर्फे आज अर्थसंकल्पीय संवाद राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्या हस्ते उद्‍घाटन

CD

पुणे, ता. ९ ः नॅशनल युथ पार्लमेंटच्या वतीने सोमवारी (ता. १०) अर्थसंकल्पीय संवाद २०२२ चे आयोजन केले असून, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंग यांच्या हस्ते परिषदेचे उद्‍घाटन करणार आहे. देशातील निवडक दीडशे शाळांचे विद्यार्थी दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत व्हर्च्युअली सहभागी होणार आहे.

युवकांचा राष्ट्र उभारणीत सहभाग वाढावा म्हणून कार्तिकेय गोयल यांनी २०१९मध्ये नॅशनल युथ पार्लमेंटची स्थापना केली. प्रत्येक राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातून पाच विद्यार्थी निवडले आहे. गोयल म्हणाले,‘‘हा आमचा सलग दुसरा अर्थसंकल्पीय संवाद आहे. २०२२-२४ चा अर्थसंकल्प देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कोविड नंतर देशाची आर्थिक उभारी, उत्पादनासह पुरवठा साखळ्यांची पुनर्रचना आणि जगातील भारताची महत्त्वपूर्ण भागीदारी हे या अर्थसंकल्पावर प्रभाव टाकणारे घटक ठरणार आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पातील तरतुदी भारताला जागतिक आर्थिक पॉवरहाऊस बनण्याचा पाया घालू शकतात. संवादाच्या माध्यमातून, तरुणांच्या सर्जनशील आणि उद्योजक वृत्तीचा उपयोग करू इच्छितो.’’
भारतीय अर्थव्यवस्थेची स्थितीसंदर्भात एक अहवालही युथ पार्लमेंटच्या वतीने प्रकाशित केला आहे. तसेच पारंपारिक हलव्याचा कार्यक्रमही घेतला आहे.
अर्थसंकल्प संवाद २०२२च्या तज्ञांच्या पॅनेलमध्ये शिक्षण मंत्रालयातील संचालक रजनीश कुमार यांचा समावेश होता. सरोवर संरक्षक आनंद मल्लिंगवाड, ओएनजीसीचे माजी संचालक अशोक वर्मा, एक्सेंचरचे व्यवस्थापकीय भागीदार विश्वेश प्रभाकर, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे आर्थिक सल्लागार अखिलेश झा, आदींचा समावेश होता. एनवायपीचे सरचिटणीस मेहक यादव यांनी प्रतिनिधींचे स्वागत केले.

उद्‍घाटन सत्रात सहभागासाठी
सोमवारी (ता.१०) सकाळी ९ वा.४५ मिनीटांनी पार पडणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागासाठी खालील संकेतस्थळावर नोंदणी करा
https://us02web.zoom.us/meeting/register/tZAkdeCsrD4jHNaslJ0mVXnQnpzW4Pp3rsB5

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT