पुणे

पुण्यात पहिले ते आठवी ऑनलाइन

CD

पुणे, ता. ४ ः कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुणे महापालिकेच्या क्षेत्रातील सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे ऑफलाइन वर्ग येत्या ३० जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी केली. या शाळांमधील सर्व वर्ग ऑनलाइन सुरु राहतील, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा मंगळवारी पवार यांनी घेतला. या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या कोरोना आढावा बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, वंदना चव्हाण, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘राज्यात ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग वाढू लागला आहे. याला आळा घालण्यासाठी मुंबई व ठाण्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला आहे. पुणे शहराने याबाबत अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना संसर्गाची स्थिती बिकट होत आहे. सध्या जगभरातील १०५ देश, भारतातील २३ राज्ये आणि राज्यातील ११ शहरांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत.’’

पुणे शहरात एकाच दिवसाचा पॉझिटीव्हीटी दर १८ टक्के झाला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या ३० जानेवारीपर्यंत पहिली ते आठवीचे वर्ग बंद राहतील. मात्र, १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना कोरोना लस देण्यास सुरवात केली असल्याने इयत्ता नववी आणि दहावीचे वर्ग सुरू राहतील.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray On Gyanesh Kumar : ‘ज्ञानेशाकडून सत्तेतले रेडे आपले वेद वदवतायत’; राज ठाकरेंचा ज्ञानेश कुमारांवर पुन्हा निशाणा

Pune Ganpati Visarjan Live Tracking: गणपती विसर्जन मिरवणूक Live; कोणतं मंडळ कुठे पोहोचलं? एका क्लिकवर पाहा लाईव्ह लोकेशन अन् ट्रॅफिक अपडेट्स

Gold Rate Today: अनंत चतुर्दशीला सोनं 11 हजारांनी स्वस्त; मुंबई-कोल्हापूरसह महाराष्ट्रभरात ताजा भाव पाहा

Maharashtra Ganesh Visarjan Live: पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात Live पाहा, ढोलताशांच्या गजरात भक्तांचा उत्साह शिगेला

Ray-Ban Glasses: मार्क झुकरबर्गने लाँच केले कॅमेरा नसलेले नवे स्मार्ट ग्लासेस; Muse AI एजंटसह 'म्युझ चार्म' डिव्हाइस बाजारात...

SCROLL FOR NEXT