पुणे

आरोपींकडून समाधान उत्तर नाही

CD

पुणे, ता. ४ : आरोग्य विभाग गट क संवर्गातील पदाच्या निवडीच्या लेखी परीक्षेची प्रश्‍नपत्रिका कशी मिळवली? या गुन्ह्यात इतर साथीदार कोण आहेत? याबाबत अटक आरोपी समाधानकारक माहिती देत नसल्याची माहिती सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी मंगळवारी (ता. ४) न्यायालयास दिली.
या गुन्ह्यात निशीद रामहरी गायकवाड (वय ४३, रा. नागपूर), राहुल धनराज लिंघोट (रा. अमरावती) आणि आशुतोष वेदप्रिय शर्मा (वय ३८, रा. दिल्ली) यांना अटक करण्यात आली आहे. यातील शर्मा याला न्यायालयाने चार जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. तर गायकवाड आणि लिंघोट यांची सहा जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी रवानगी करण्यात आली आहे. शर्मा हा एजंट असून त्याची पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपींनी गुन्ह्याचा कट आणि त्याची कार्यपद्धती तपासादरम्यान पोलिसांना सांगितली आहे. अटक आरोपींनी पाहिजे असलेल्या आरोपींच्या मदतीने परीक्षेपूर्वी काही दिवस आधी कट रचून प्रश्‍नपत्रिका फोडल्यानंतर ती उमेदवारांना देवून त्यांच्याकडून काही रक्कम घेतली आहे. मात्र आरोपींनी प्रश्‍नपत्रिका कशी मिळवली. त्यात इतर कोण साथीदार आहेत, याबाबत आरोपी समाधानकारक उत्तर देत नाहीत, असा युक्तिवाद ॲड. जाधव यांनी केला. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी शर्मा याच्या पोलिस कोठडीत सात दिवसांची वाढ करण्याची मागणी ॲड. जाधव यांनी केली. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांनी शर्मा याच्या पोलिस कोठडीत १० जानेवारीपर्यंत वाढ केली आहे. या गुन्ह्याचा तपास सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयंत राजूरकर करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT