coronavirus
coronavirus sakal
पुणे

पुण्यात कोरोनाची दुसरी लाट ठरली प्रलयकारी

सकाळ वृत्तसेवा

राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात ९ मार्च २०२० रोजी आढळला. त्याला आता दोन वर्षे पूर्ण होत आहेत.

पुणे - पुणे शहरात (Pune City) कोरोनाची (Corona) बेसुमार वेगाने वाढणारी रुग्णसंख्या... एकेका बेडसाठी रुग्णालयांच्या (Patients) बाहेर रुग्णांच्या लागलेल्या रांगा... ऑक्सिजन बेड (Oxygen Bed) मिळविण्यासाठी जिवाच्या आकांताने रुग्णांच्या नातेवाइकांची सुरू असलेली वणवण... ते रॅमडेसिव्हीर इंजेक्शनसाठी (Remdesivir Injection) केलेले शेकडो फोन हे सगळं-सगळं भयंकर चित्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुण्याने अनुभवले. म्हणून पहिल्या आणि तिसऱ्यापेक्षा कोरोनाची दुसरी लाट प्रलयकारी ठरली.

राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात ९ मार्च २०२० रोजी आढळला. त्याला आता दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या दरम्यान, कोरोनाच्या दोन लाटे पुण्यावर आदळल्या. त्यापैकी दुसरी लाट सर्वांत विदारक ठरली.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. पण, २०२० ला निरोप देताना ही रुग्णसंख्या कमीदेखील झाली. दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद झाली. त्यात मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही जास्त होती. तिसऱ्या लाटेत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असली तरीही त्यामुळे अत्यवस्थ होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अत्यल्प होते. बहुतांश रुग्ण घरातच उपचार घेऊन बरे झाले. त्यामुळे मृत्यूचे सर्वांत कमी प्रमाण तिसऱ्या लाटेत दिसले. मृत्यू होणाऱ्यामध्येही ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधि असलेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्याचे निरीक्षण नोंदण्यात आले.

- डॉ. संजय वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका.

पुणे

वर्ष ......... कोरोनाबाधित .......... मृत्यू

२०२० ..... १,७९,०७१ ................. ४,६३२

२०२१ ...... ३,३१,५४६ ................ ४,४८५

२०२२ ...... १,५०,४४४ ............... २३१

महाराष्ट्र

वर्ष ......... कोरोनाबाधित .......... मृत्यू

२०२० ..... १९,४४,८८९ ................. ५३,४५६

२०२१ ...... ४७,५०,६०६ ................ ८६,३१०

२०२२ ...... ११,४०,०४७ ............... १९५२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT