पुणे

दुकानाला भगदाड पाडून ३०७ मोबाईलची चोरी

CD

पुणे, ता. २३ : मोबाईल शॉपीच्या भिंतीला ड्रिल मशिनने भगदाड पाडून चोरट्यांनी ५२ लाखांचे ३०७ मोबाईल चोरी केले. चोरट्यांनी सर्व मोबाईलवरील कव्हर दुकानातच टाकून केवळ मोबाईलवर डल्ला मारला. त्यात आयफोनसह इतर महागड्या मोबाईलचा समावेश आहे. ही घटना शहरातील मध्यवस्तीमध्ये सोमवार पेठेतील खुराणा सेल्समध्ये घडली.
या प्रकरणी मुकेश खुराणा (वय ३९, रा. ताथवडे) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोमवार पेठेतील आगरकर शाळेसमोर खुराणा सेल्स मोबाईल शॉपी आहे. दुकानमालक गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मोबाईल शॉपी बंद करून घरी गेले. त्यानंतर चोरट्यांनी दुकानाच्या मागच्या बाजूने भिंतीला ड्रिल मशिनने भगदाड पाडले. त्यातून दुकानात प्रवेश करून सर्व मोबाईल चोरून नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मोबाईल शॉपी उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला. घटनेनंतर पोलिस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर आणि वरिष्ठ निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी घटनास्‍थळाची पाहणी केली. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, वारजे माळवाडी परिसरात भरदिवसा सोन्याचे दुकान अशाच प्रकारे फोडण्यात आले होते. सराफा व्यापारी दुपारी जेवण करण्यासाठी गेल्यानंतर भिंतीला भगदाड पाडून दोन किलो सोने चोरून नेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये पेट्रोल तब्बल 10 रुपये स्वस्त! तुमच्या शहरात आजचा दर किती?

Kagal Politics : हसन मुश्रीफ आणि घाटगे एकत्र कसे आले? CM फडणवीसांच्या कागल दौऱ्यापूर्वीच समरजितसिंह घाटगे यांनी स्पष्टच सांगितली पडद्यामागची कहाणी

Bhandardara Accident: भंडारदरा पर्यटनाला गालबोट! मद्यपींची हुल्लडबाजी, भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या पथकाने केलेल्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो- पंतप्रधान मोदी

Buldhana Farmer Loan Waiver: बुलडाण्यात १.१६ लाख पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, ६७ हजार ई केवायसी प्रलंबित

SCROLL FOR NEXT