पुणे

सशस्त्र दलातील १४३ अधिकाऱ्यांना पदवी

CD

पुणे, ता. २४ ः लष्कराच्या तिन्ही दलातील अधिकाऱ्यांना तांत्रिक शिक्षण पुरविणाऱ्या पुण्‍यातील मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा (मिलिट) ‘डिफेन्स सर्व्हिसेस टेक्निकल स्टाफ कोर्स’ (डिएसटीसी) पदवी समारंभ नुकताच झाला. यामध्ये सशस्त्र दलातील १४३ अधिकाऱ्यांनी पदवी पूर्ण केली. यात श्रीलंकेतील सात अधिकाऱ्यांचा समावेश होता.
लष्कराच्या विविध विभाग आणि मुख्यालयांमधील नियुक्त्यांसाठी सशस्त्र दलातील अधिकाऱ्यांसाठी डिएसटीसीचा अभ्यासक्रम आयोजित करण्यात येतो. या पदवी समारंभ कार्यक्रमात चीफ ऑफ इंटिग्रेटेड स्टाफ टू चेअरमन, चीफ्स ऑफ स्टाफ एअर मार्शल बी. आर. कृष्णा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी मिलिटचे प्रमुख एअर व्हाइस मार्शल व्ही. राजशेखर, तिन्ही दलातील वरिष्ठ प्राध्यापक व अधिकारी उपस्थित होते.
एअर मार्शल कृष्णा म्हणाले, ‘‘कृत्रिम बुद्धीमत्ता, सायबर सुरक्षा, इंटरनेट ऑफ थिंग्ज सारख्या तंत्रज्ञानाचे मिलिटद्वारे देण्यात येणारे प्रशिक्षण कौतुकास्पद आहे. अधिकाऱ्यांनी या संस्थेत मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या सुरक्षेसाठी करावा. सशस्त्र दलांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यावर तसेच त्यांचा वापर वाढविण्याची गरज आहे. नव्याने उदयास येत असलेल्या तंत्रज्ञानाची जाण असलेल्या अधिकाऱ्यांची सशस्त्र दलांना आवश्‍यकता आहे. त्यामुळे सशस्त्र दलात आवश्‍यक ती अद्ययावत उपकरणे समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी अशा विशिष्ट तंत्रज्ञानाचा सातत्याने अभ्यास करणे गरजेचे आहे.’’ तसेच ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पने अंतर्गत अधिकाधिक प्रकल्प यशस्वी व्हावेत, यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना तांत्रिक गरजा तयार करताना वास्तववादी राहण्याचा सल्ला दिला.
या कोर्स दरम्यान उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT