पुणे

निकाल वेळेत लागणार का?

CD

पुणे, ता. २४ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने येत्या सत्रातील सर्व परीक्षा नेहमीच्या म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने घेणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, ऑफलाइन परीक्षेसाठी लागणारा कालावधी हा ऑनलाइन परीक्षेपेक्षा जास्त असून, उशिरा लागणारे निकाल पुढील प्रवेशासाठी अडचण निर्माण करतील, अशी भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नागपूर विद्यापीठाप्रमाणेच या सत्राची परीक्षा ऑनलाइन घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी करत आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लेखी परीक्षा या ऑनलाइन स्वरूपात घेण्यात येणार आहेत. त्याचवेळी, प्रात्यक्षिक परीक्षा या ऑफलाइन स्वरूपात होतील. विद्यापीठाच्या शिक्षण मंडळात हा निर्णय गुरुवारी घेण्यात आला होता. या निर्णयाचे पडसाद राज्यभरातील विद्यापीठांवर पडले आहे. सावन मेहता म्हणतो, ‘‘आतापर्यंत आमचे एक युनिट शिकवून झाले आहे. लेखी परीक्षा तीन युनिटची होणार आहे. त्यानंतर प्रात्यक्षिक आणि इतर अहवालांची पूर्तता करावी लागणार आहे. प्रकल्पांचे कामही चालू आहे. ही प्रक्रिया खूपवेळ खाऊ आहे. जर ऑनलाइन परीक्षा घेतली, तर वेळ वाचेल आणि आम्हाला पुढील प्रवेश परीक्षांनाही वेळ मिळेल.’’

‘‘विद्यार्थ्यांच्या अडचणी पाहता नागपूर विद्यापीठाप्रमाणे राज्यातील विद्यापीठांनी एका सत्रापुरता असा शहाणा निर्णय घेतला पाहिजे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तर साडेसहा लाख विद्यार्थ्यांची ऑफलाइन परीक्षा वेळेत कशी घेणार हा प्रश्न आहे.’’
- अविनाश मोरे, विद्यार्थी

‘‘ऑफलाइन परीक्षांचा निकाल वेळेत लावण्याचे मोठे आव्हान पुणे विद्यापीठासमोर आहे. कारण आम्हाला जून महिन्यात कंपनीमध्ये निकाल द्यायचा आहे.’’
- रोहीत शितोळे, विद्यार्थी

‘‘मार्च महिन्यापर्यंत हिवाळी परीक्षा चालू होत्या. तीन महिने उशिराने परीक्षा सुरू झाल्यात. आता लगेच उन्हाळी परीक्षा होणार आहे. त्यामुळे आमच्या अडचणी अधिकच वाढल्या आहे. विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षांद्वारे दिलासा द्यायला हवा.’’
- सौरभ पाटकुळे, विद्यार्थी

‘‘हिवाळी सत्रातील परीक्षा उशिरा झाल्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांवर ताण आला आहे. मात्र, ऑनलाइन परीक्षेने हा प्रश्न सुटणार नाही. ऑफलाइन परीक्षा वेळेत होण्यासाठी विद्यापीठाने नियोजन केले आहे. विद्यापीठाचा दर्जा आणि विद्यार्थ्यांचे दीर्घकालीन हीत लक्षात घेता नेहमीच्या पद्धतीनेच परीक्षा घेणे गरजेचे आहे.’’
- प्रा. मगन ताटे, माजी अधिसभा सदस्य

तुम्हाला काय वाटते?
कोरोनानंतर प्रथमच परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनेक मतप्रवाह आहेत. विद्यार्थ्यांची परीक्षा नक्की कशी घ्यावी, काय आहे तुमचे मत? आम्हाला कळवा editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Open or Closed Update: अनंत चतुर्थीला महाराष्ट्रात बँका सुरू की बंद? RBI कडून मोठी अपडेट

IND vs WI, Live Streaming: भारत-वेस्ट इंडिज संघात ३ वनडे अन् ५ टी२० सामन्यांचा रोमांच! कधी, कुठे अन् किती वाजता पाहाणार मॅच?

Nandigram By-Election Symbol Controversy : निवडणूक आयोगाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर; 183 चिन्हं असताना 'लिफाफा' वरच वाद का? हायकोर्टानं कोणाला सुनावलं?

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Thane Water Supply: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! २४ तास पाणीकपात, कोणत्या भागांना फटका?

SCROLL FOR NEXT