पुणे

भूमि अभिलेखकडे ३५ रोव्हर मशिन

CD

पुणे, ता. २४ : पुणे जिल्ह्यातील मोजणीच्या कामाला आता अधिक गती येणार आहे. भूमि अभिलेख विभागाकडे ३५ रोव्हर मशिन दाखल झाले आहेत. या मशिनच्या साहाय्याने जिल्ह्यात महिन्याला सरासरी दोन हजार ते बावीसशे मोजणीची प्रकरणे निकाली लावणे शक्य होणार आहे. परिणामी, जमिनींची मोजणीसाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही.

जमिनीची अचूक आणि कमी वेळेत मोजणी करण्यासाठी भूमि अभिलेख विभागाने ‘सर्व्हे ऑफ इंडिया’च्या मदतीने राज्यात ७७ ठिकाणी कॉर्स (कन्टिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन) उभारले आहे. या कॉर्सआधारे जीपीएस रीडिंग केवळ ३० सेकंदात घेता येते. कॉर्सचे रीडिंग रोव्हर रिसिव्ह करणार असून, हे रीडिंग टॅबमध्ये दिसणार आहे. हे रोव्हर खरेदी करण्यासाठी पुणे जिल्हा नियोजन समितीकडून दोन कोटी ९९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. यातून ३५ रोव्हर खरेदी केले आहेत. यापूर्वी पहिल्या टप्प्यात ११ रोव्हर प्राप्त झाले. उर्वरित २४ रोव्हर जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयाला नुकतेच प्राप्त झाले आहेत. भूमि अभिलेख विभागाने १०० कर्मचाऱ्यांना रोव्हर वापरण्याचे प्रशिक्षणसुद्धा दिले आहे. एका रोव्हरमुळे दररोज चार ते पाच ठिकाणच्या मोजणी पूर्ण होणार आहेत. यामुळे जिल्ह्यात जमिनीची मोजणी गतीने वाढणार असून, मोजणीची प्रक्रिया अत्यंत कमी वेळात आणि अचूक होणार आहे.

- सध्या अशी होते मोजणी
जमीन मोजणीसाठी सध्या भूमी अभिलेख विभागाकडून ईटीएस मशिनच्या साहाय्याने मोजणी करण्यात येते. जागेवर जीपीएस रीडिंग घेऊन त्या क्षेत्राचे अक्षांश व रेखांश घेतले जाते. या अक्षांश व रेखांशच्या आधारे जमीन मोजणी करणे सोयीचे ठरते. मात्र, सध्याच्या अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानानुसार अचूक जीपीएस रीडिंग घेण्यासाठी किमान एक ते चार तास लागतात.

- आता अशी होणार मोजणी
रोव्हर मशिनच्या माध्यमातून जीपीएस रीडिंग घेण्यासाठीचा हा वेळ कमी होणार आहे. हा वेळ कमी करण्यासाठी अभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने कॉर्स बसविले आहे. या कॉर्सआधारे जीपीएस रीडिंग केवळ ३० सेकंदात घेता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DK Shivakumar : कर्नाटकातील १२ आमदारांची दोन लग्ने; खुद्द मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे यादी, बंगळूरला स्थायिक झाल्याची माहीती

पत्नीच्या वाढदिवसानिमित्त स्वप्नील जोशीची खास पोस्ट; सुरू केलाय खास व्यवसाय; म्हणतो- जितकी मेहनत या ब्रॅण्डसाठी घेतेयस...

ना ढोल-ताशे, ना गर्दी... एकट्या भक्ताचा स्वतः घडवलेला बाप्पाला भावूक निरोप; डोळे पाणावणारा Video Viral

Madhya Pradesh: २१ वर्षांनंतर सरकारी बससेवेचे पुनरागमन; स्वतः तिकीट काढून मुख्यमंत्र्यांनी केला बस प्रवास video viral

Latest Marathi News Live Update : कोयना धरणातून ३,९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT