पुणे

अवकाळी पावसासह उष्णतेचा इशारा

CD

पुणे, ता. २४ ः राज्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असताना आता मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तर सोमवारी (ता. २५) कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली होती. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद वर्धा येथे ४२.५ अंश सेल्सिअस इतकी झाली. कमाल तापमानातही चढ-उतार कायम आहे. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे राज्यात ४५ अंशांच्या घरात पोचलेले कमाल तापमान खाली घसरले असून विदर्भात मात्र पारा ४० ते ४२ अंशांच्या दरम्‍यान आहे. विदर्भ वगळता उर्वरित राज्यातील बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात सरासरीपेक्षा २ ते ७ अंशांनी घट पाहायला मिळत आहे.
सध्या नैऋत्य मध्यप्रदेश व परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय असून यामुळे मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा ते उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा प्रवाह खंडित झाला आहे. परिणामी राज्यात पावसासाठी हवामान अनुकूल झाले आहे. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात सोमवारपासून (ता. २५) तर, विदर्भात मंगळवारपासून (ता. २६) तुरळक भागात उष्णतेची लाट येऊ शकते.

येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
सोमवार (ता. २५) ः नगर, पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, लातूर
मंगळवार (ता. २६) ः सातारा, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, नांदेड, लातूर,
बुधवार (ता. २७) ः बीड, लातूर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, नांदेड, परभणी
गुरुवार (ता. २८) ः सातारा, सांगली, सोलापूर

उष्णतेच्या लाटेचा इशारा
सोमवार (ता. २५) ः जळगाव
मंगळवार (ता. २६) ः नगर, जळगाव, बुलडाणा, अकोला
बुधवार (ता. २७) ः जळगाव, नगर, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली
गुरुवार (ता. २८) ः जळगाव, नगर, बुलडाणा, यवतमाळ, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT