पुणे

‘तू छेड सखी सरगम’मध्ये सदाबहार गीतांचे सादरीकरण

CD

पुणे, ता. ९ ः यमन, बागेश्री, भीमपलास, भैरवी या रागांवर आधारित ‘अलबेला सजन’, ‘शुक्रतारा मंदवारा’, ‘लागा चुनरी में दाग’ या सदाबहार गीतांनी रसिक नुकतेच मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते, भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ‘तू छेड सखी सरगम’ या कार्यक्रमाचे.
सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात राग संगीतावर आधारित लोकप्रिय गाण्यांचे सादरीकरण केले. अहिर भैरव रागातील ‘अलबेला सजन’, ‘माझिया मना’, राग बागेश्रीतील ‘येथोनी आनंदू’, ‘राधा ना बोले, ना बोले’, भीमपलास रागातील ‘जय शारदे वागेश्वरी’, ‘नयनों में बदरा छाये’ आणि यमन रागातील ‘समाधी साधन’, ‘आज जाने की जिद ना करो’ आदी गीतांना रसिकांची दाद मिळाली. भैरवी रागातील गाण्यांनी समारोप केला. कार्यक्रमाची संकल्पना, संहिता आणि निवेदन सुप्रिया चित्राव यांचे होते. श्रुती देवस्थळी, अभिजित पंचभाई यांनी गीते सादर केली. विनीत तिकोनकर यांनी तबल्यावर, प्रसन्न बाम यांनी संवादिनीवर तर धनंजय साळुंके यांनी तालवाद्यावर साथसंगत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचं जालन्यात इमर्जन्सी लँडिंग

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Shilpa Shetty: शिल्पाच्या मुलाला पंजुर्लीने दिला आशीर्वाद! काय आहे शिल्पाचं कांतारा कनेक्शन ?

Big Discount: केंद्रानंतर 21 राज्यांनी केली घोषणा! जुनी कार स्क्रॅप करून नवीन कारवर मिळेल 50 हजारांची सूट

SCROLL FOR NEXT