पुणे

चला वीज वाचवूया...

CD

पुणे, ता. २५ : गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट सुरू आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत विक्रमी वाढ झालेली आहे. वीजबिलांच्या बचतीसाठी, तसेच सद्यःस्थितीत विजेची मागणीही वाढत असल्याने सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांनी आवश्यकतेनुसारच विजेचा वापर करावा. यामध्ये विशेषतः सकाळी सहा ते दहा व सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत विजेचा कमीत कमी वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

...अशी करा वीज बचत
- घर किंवा कार्यालयांमध्ये सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करावा
- उपयोगात नसतील, तेव्हा विद्युत उपकरणे व लाइट बंद करावेत
- पंखे, एअर कंडिशनर, गीझर, वॉशिंग मशिन, इस्त्री, रेफ्रिजरेटर, मायक्रोवेव्ह ओव्हन, ज्यूसर, फूड प्रोसेसर, मिक्सर, ग्राइंडर, कॉम्प्युटर, चार्जर, व्हॅक्यूम क्लीनर अशी उपकरणे वीज बचतीच्या जाणीवेने वापरावीत
- उन्हाळ्यात फ्रिजमधून एकेक भाजी किंवा थंड पदार्थ काढण्याऐवजी आवश्यक भाज्या किंवा पदार्थ एकदाच काढावेत
- दरवाजा सतत उघडावा लागल्यास फ्रीजमधील तापमान वाढते व विजेचा वापर जास्त होतो
- टीव्ही, संगणक आदी उपकरणे रिमोट कंट्रोलऐवजी थेट स्वीच बोर्डपासून बंद करावीत

...अशी घ्या बचतीसाठी काळजी
उन्हाळ्यात एअर कंडिशनरचा (एसी) वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. एसीला पंख्यापेक्षा नऊ पट अधिक वीज लागते. त्यामुळे एसीची गरज नसल्यास शक्यतो पंखाच वापरावा. एसी वापरायचा असल्यास नियमितपणे त्याचे फिल्टर तपासणे, स्वच्छ करणे, एसी सुरू असताना दरवाजे, खिडक्या व्यवस्थित बंद करणे आवश्यक आहे. गारवा निर्माण झाला की शक्य असल्यास एसी बंद करावा व पंखा वापरावा. स्मार्ट मोबाईल, लॅपटॉप, टॅबला सतत चार्जिंग करावे लागते. त्यामुळे या वस्तूंचे चार्जिंग झाल्यानंतर बटण बंद करण्याचा कंटाळा करू नये. तसेच इमारतींमध्ये दोन लिफ्ट असल्यास एखादी लिफ्ट लवकर येईल म्हणून दोन्ही लिफ्टचे बटण दाबले जाते, त्यापेक्षा ज्या लिफ्टचे बटण दाबले ती लिफ्ट येईपर्यंत प्रतीक्षा करावी, असे अनेक उपाय करून वीजबचतीला हातभार लावण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : एल्फिन्स्टन ब्रिज परिसर जलमय, सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT