पुणे

संतोष जगताप खून प्रकरणात सहा जणांना मोक्का कोठडी

CD

पुणे, ता. ४ : वाळू व्यावसायिक असलेला सरार्इत गुन्हेगार संतोष जगताप याच्या खून प्रकरणात न्यायालयाने सहा जणांना सात जानेवारीपर्यंत मोक्का कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला. विशेष न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी हा आदेश दिला.
पवन ऊर्फ प्रशांत गोरख मिसाळ (वय २९), महादेव बाळासाहेब आदलिंगे (वय २८), उमेश सोपान सोनवणे (वय ३५), अभिजित अर्जुन यादव (वय २२), बाळू जगन्नाथ वाघमोडे (वय २८), महेश भाऊसाहेब सोनवणे (वय २८) अशी मोक्का कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. संतोष संपत जगताप (वय ३६) आणि त्याचा बॉडीगार्ड मोनुसिंग अरुणकुमार सिंग (वय ३४) यांचा २२ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी अडीच वाजता उरुळी कांचन येथील सोनाई हॉटेल समोर गोळ्या घालून खून करण्यात आला होता. आरोपी उमेश सोनवणे आणि संतोष जगताप या दोघांमध्ये वाळू व्यावसायावरून वाद होते. त्यातून हा गोळीबार आणि खून झाला होता. आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याबाबत त्यांच्याकडे तपास करायचा आहे. त्यांचे आणखी साथीदार व गुन्ह्यात वापरलेली बंदूक शोधण्यासाठी मोक्का कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Hydrogen Fuel Statement : पेट्रोल-डिझेल गाड्या होणार बंद? नितीन गडकरींचं मोठं विधान; आता पेट्रोलऐवजी 'या' इंधनावर धावणार गाड्या!

आई मुस्लिम, वडील गुजराती... एकमेकांवर प्रेम असूनही आरती सोलंकीचे आई-वडील झालेले वेगळे, हे होतं कारण

Latest Marathi News Live Update : सोलापूर जिल्ह्यातील भोंदूबाबा मनोहर भोसलेला दिलासा नाहीच; 2 मे'पर्यंत पोलिस कोठडीत वाढ

Hadapsar Fire : सिलेंडरमधून गॅस गळती होवून लागलेल्या आगीत दुकाने जळून खाक, दोनजण जखमी

PBKS vs RR Live: २,४,६,४,४,१, ४! प्रियांश आर्यने ७ चेंडूंत राजस्थानला झोडले; जोफ्रा आर्चर कर्णधार रियानवर संतापला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT