पुणे

साळोख तलावाचा श्‍वास कोंडला

CD

कर्जत, ता. १६ (बातमीदार) : तालुक्यात सर्वात मोठा तलाव म्हणून साळोख येथील तलावाची ओळख आहे. चार एकर क्षेत्रावरील या तलावाच्या दुरुस्तीकडे जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ साचून दलदल तयार झाली आहे.

एकेकाळी साळोख तलाव गावाच्या वैभवात भर घालत होता. ग्रामस्थांबरोबरच जनावरांची तहान भागवण्यासाठी त्याचा मोठा आधार होता. परिसरातील विहिरी, कूपनलिकांनाही त्याचा उपयोग होता. सहा-सात वर्षांपूर्वी रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी तीन लाखांचा निधीची तरतूद करून त्याची किरकोळ बांधबंदिस्ती केली होती. मात्र गाळ काढून झरे मोकळे करणे, सुशोभीकरण ही कामे दुर्लक्षित राहिली. झुडपे आणि वेलींचाही त्याला विळखा आहे.

तलावाला नवसंजीवनी दिल्यास आजूबाजूच्या परिसरातील जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होईल. गायी-गुरांची पिण्याची सोय होईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
------------------------------------------------------
... तर असा होणार फायदा
मत्स्य व्यवसायासाठी तलाव लिलाव पद्धतीने दिल्यास ग्रामपंचायतीला आर्थिक महसूल मिळेल. तलावात माशांबरोबरच कमळ, शिंगाडे यांचेही उत्पादन घेणे शक्य होऊ शकते. बारमाही पाणी राहिल्यास येथील वातावरण आल्हाददायक राहण्यास मदत होईल.
---------------------------------------------------
पर्यटनासाठी उपयुक्त
कर्जत तालुका पर्यटनदृष्ट्या विकसित होत आहे. तालुक्यातील पर्यटनासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून साडेसहा कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. अशाच प्रकारे साळोख येथील तलावाच्या नूतनीकरण आणि सुशोभीकरणासाठी निधी प्राप्त झाल्यास तलावाचे सौंदर्य फुलून तो पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू शकतो.
-------------------------------------------------
साळोख तलावाच्या परिसरात मंदिर आणि समाजमंदिर आहे. गावातील गणेशाचे विसर्जन करण्यासाठी हा तलाव एकमेव ठिकाण आहे. अशा या तलावाची आता दुरवस्था झाली आहे. भरीव निधीची तरतूद करून त्याला गतवैभव प्राप्त करून देण्याची गरज आहे.
- चंद्रकांत मांडे, माजी सरपंच, साळोख.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT