पुणे

शेकडो निराधार महिला मदतीच्या प्रतीक्षेत

CD

रमेश औताडे : सकाळ वृत्तसेवा

कोपरखैरणे, ता. १६ : कोरोना काळात ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले, त्यांना नवी मुंबई महापालिकेकडून दीड लाख रुपये एकरकमी मिळणार होते. मात्र गेल्‍या दीड वर्षांत कोरोना संसर्ग रोखण्यात व्यग्र असलेल्‍या महापालिका प्रशासनाला त्‍यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. आता कोरोना रुग्‍ण संख्या कमी झाल्‍याने वेळात वेळ काढून भरपाईचे रक्‍कम अदा करा आणि आमची परवड थांबवा, अशी मागणी शहरातील शेकडो निराधार महिलांनी केली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या समाज कल्याण विभागामार्फत विविध घटकांतील वर्गाला आर्थिक मदत करण्यात येते. या घटकांपैकी निराधार महिलांना दीड लाख रुपये एकरकमी देण्याचे पालिकेचे धोरण आहे. कोरोना काळात ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले आहे अशा महिलांनी अटीशर्तीच्या अधीन राहून महापालिकेकडे अर्ज केल्‍यास निकषांच्या आधारे त्‍यांना दीड लाख रुपयांची मदत केली जाते. यासाठी शहरातील शेकडो महिलांनी अर्ज केले आहेत, मात्र त्‍याच्या पदरी अद्याप काहीही पडलेले नाही. त्‍यामुळे महिलांकडून प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्‍त होत आहे. अर्जासाठी असलेली उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.

शिष्‍यवृत्तीही रखडली
गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती प्रकरणीही पालिकेने अद्याप लक्ष दिले नसल्यामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती घेऊ शकले नाहीत. काही निराधार महिलांच्या मुलेही यामध्ये लाभार्थी आहेत. महागाईच्या काळात पती निधनानंतर मुलांचे शिक्षण व घर खर्च भागवताना खूप ओढाताण होत असल्‍याने महापालिकेने लवकरात लवकर मदतीची रक्‍कम द्यावी, अशी मागणी निराधार महिलांकडून होत आहे.


निराधार महिलांना आर्थिक मदत मिळण्याबाबत नवी मुंबई महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले आहे. महिनाअखेर महिलांना न्याय मिळेल, असे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले आहे.
- शीतल कचरे,
महिला शहर संघटक, शिवसेना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याप्रकरणी दिरंगाई झाली असली तरी महिनाअखेर विद्यार्‍थ्‍यांना शिष्यवृत्ती व निराधार महिलांना एकरकमी मदत ही दोन्ही प्रकरणे निकाली काढण्यात येतील. तसेच उत्पन्नाच्या दाखल्याची अट या बाबतीतही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
- अभिजित बांगर, आयुक्त
नवी मुंबई महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

SCROLL FOR NEXT