पुणे

शहराच्या वेगवेगळ्या भागात घरफोड्यांच्या घटना शहराच्या वेगवेगळ्या भागात घरफोड्यांच्या घटना

CD

पुणे, ता. ४ ः लोहगाव व सिंहगड रस्ता परिसरामध्ये घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातून तेरा लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या प्रकरणी विमानतळ व सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ेलोहगाव येथे झालेल्या चोरीप्रकरणी आकाश खांदवे (वय २८) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचे लोहगाव-वाघोली रस्त्यावरील दादाचीवस्ती येथे घर आहे. रविवारी त्यांचे घर बंद होते. दरम्यान, रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी घरातील तीन बेडरुममध्ये असलेल्या कपाटातील ८ लाख ७९ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन जाधव करीत आहेत.

नऱ्हे येथील चोरीप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेची नऱ्हे-धायरी रस्त्यावरील एका सोसायटीमध्ये सदनिका आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्यांनी कपाटातील तीन लाख ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व ४५ हजार रुपयांची रोख रक्कम असा ४ लाख ३५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samarjeet Ghatge: समरजीत घाटगे पुन्हा भाजपमध्ये जाणार! तारीखही आली; स्वतःच सांगितलं घरवापसीचं कारण

IPL 2026 : रोहित शर्माला झटका... मुंबई इंडियन्सची हार होताच, समोर आली मोठी बातमी; समीर रिझवी ठरला कारणीभूत

GT vs RR Live : गुजरात टायटन्सचे नेतृत्व राशीद खान याच्याकडे; शुभमन गिल याला नेमकं काय झालं? IPL 2026 मध्ये मोठा ट्विस्ट

सीईटी परीक्षेत संतापजनक प्रकार, पेपरात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, कारवाईची मागणी

Horoscope News : 'या' तारखेपासून शनीदेव बदलणार 5 राशींचं नशीब ! शंकराची होणार कृपा, भाग्योदयाची सुरुवात

SCROLL FOR NEXT