पुणे

पिंपळे हल्ला प्रकरणी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती

CD

ठाणे, ता. १६ ः ठाणे पालिका हद्दीतील माजिवाडा-मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. आता या हल्ल्याप्रकरणी जलदगती न्यायालयात ॲड. शिशिर हिरे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली आहे.
माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमधील कासारवडवली भागातील मार्केट परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे यांच्यावर दिनांक ३० ऑगस्ट, २०२१ रोजी फेरीवाल्यांकडून चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी जलदगती न्यायालय स्थापन करणे व विशेष सरकारी वकील यांची नियुक्ती करणे याबाबत ठाणे महापालिकेच्यावतीने शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने विधी व न्याय विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत जलदगती न्यायालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव मा. उच्च न्यायालयास शासन पत्रान्वये पाठविण्यात आला आहे. सदर प्रकरणी शासनाच्या अधिसूचनेनुसार अॅड. शिशिर हिरे यांची विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
...

पाच लाखांचा धनादेश
फेरीवाल्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पिंपळे आणि त्यांचे सुरक्षा रक्षक सोमनाथ पालवे यांना महाराष्ट्र शासनाकडून अर्थसाह्य स्वरूपात जाहीर झालेल्या मदतीचा पाच लाख रुपयांचा धनादेश ठाणे तहसीलदार युवराज बांगर यांनी बुधवारी पिंपळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT